संरक्षण मंत्रालय

भारतीय सैन्य दलाच्या स्वर्णिम विजय वर्ष समारंभासाठी ऑनलाईन घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रवेशिका मागवण्यात आल्या

Posted On: 07 APR 2021 12:29PM by PIB Mumbai

1971  च्या भारत-पाकिस्तान युद्धात  पाकिस्तानवर भारताच्या विजयाची   50  वर्ष साजरी करण्यासाठी देशभरात स्वर्णिम विजय वर्ष उत्सव आयोजित केले जात आहेत. या उत्सवांचा एक भाग म्हणून भारतीय सैन्य आपले योगदान अधोरेखित  करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. चार विजय मशाली  यापूर्वीच चार मुख्य दिशांना पाठवण्यात आल्या आहेत

सध्या सुरू असलेल्या स्वर्णिम विजय वर्ष उत्सवाचा एक भाग म्हणून भारतीय सैन्य 01 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत ऑनलाईन घोषवाक्य  लेखन स्पर्धा आयोजित करत आहे. ही स्पर्धा भारतातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे आणि यासाठी प्रवेशिका swarnimvijayvarsh.adgpi[at]gmail[dot]com  वर पाठवता येतील. भारतीय लष्कराच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर हँडल्सवर या स्पर्धेचा तपशील उपलब्ध आहे.

निवडलेल्या घोषवाक्यांचा वापर भारतीय सैन्याच्या अधिकृत माध्यमांद्वारे केला जाईल  आणि विजेत्या प्रवेशिकांना रोख बक्षिस दिले जाईल.

***

MC/SK/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1710064) Visitor Counter : 352