अर्थ मंत्रालय

पीएमएमवाय सुरू झाल्यापासून बँका, एनबीएफसी आणि एमएफआय यांनी 14.96 लाख कोटी रुपयांची 28.68 कोटीहून अधिक कर्ज मंजूर केली


पीएमएमवायने 2015 ते 2018 पर्यंत 1.12 कोटी अतिरिक्त रोजगार निर्मितीमध्ये मदत केली

Posted On: 07 APR 2021 9:43AM by PIB Mumbai

वंचित आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या उपेक्षित वर्गाला आर्थिक समावेशकता आणि मदत पुरवण्यासाठी अर्थ मंत्रालय वचनबद्ध आहे. नवोदित उद्योजकांपासून कष्टकरी शेतकर्‍यांपर्यंतच्या सर्व हितधारकांच्या आर्थिक गरजादेखील विविध उपक्रमांच्या माध्यमातून पूर्ण केल्या गेल्या आहेत. या दृष्टीने महत्वाचा पुढाकार म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) आहे जिने स्वाभिमान  आणि स्वातंत्र्य या भावनेसह लाखो लोकांच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना पंख दिले आहेत.

पीएमएमवाय अंतर्गत  अनुसूचित वाणिज्य बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी), लघु वित्त बँका (एसएफबी), बिगर  बँकिंग वित्तीय  कंपन्या (एनबीएफसी), सूक्ष्म वित्तीय संस्था (एमएफआय) इत्यादी  कर्जपुरवठा संस्थांनी 10  लाखांपर्यंत तारणमुक्त कर्ज दिले आहे.

मुद्रा कर्ज ‘शिशु’, ‘किशोर’ आणि ‘तरुण’ या तीन प्रकारात दिले जाते,  जे कर्जदाराच्या वाढीच्या किंवा विकासाच्या आणि अर्थसहाय्याच्या टप्प्याचे प्रतीक आहेत.

शिशुः 50,000/- रुपयांपर्यंत कर्ज

किशोरः रू. 50,000/ - पेक्षा अधिक  आणि 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज

तरुण:  5 लाख रुपयांपेक्षा अधिक आणि 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज

या योजनेची कामगिरी   (19.03.2021 रोजी)

योजना सुरू झाल्यापासून (19.03.2021) पर्यंत 14.96 लाख कोटी रुपयांची  28.68 कोटीहून अधिक कर्ज मंजूर झाली  आहेत

2020-21 मध्ये (19.03.2021)पर्यंत  4.20 कोटी पीएमएमवाय कर्जे मंजूर झाली आणि आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये   2.66 लाख कोटी रुपये मंजूर झाले आहेत

कर्जाची सरासरी रक्कम  सुमारे 52,000/- आहे

कर्जांपैकी 88% कर्जे ‘शिशु’ प्रकारातील आहेत

जवळपास 24% कर्ज नवीन उद्योजकांना देण्यात आली

सुमारे 68% कर्ज महिला उद्योजकांना देण्यात आली

सुमारे 51% कर्ज एससी/एसटी/ओबीसी कर्जदारांना देण्यात आली

अनुसूचित जाती आणि जमातीचे प्रमाण एकूण कर्जदारांच्या   22.53% आहे

ओबीसींची संख्या  कर्जदारांच्या एकूण संख्येच्या 28.42% आहे

अल्पसंख्याक समुदायातील  कर्जदारांना सुमारे 11% कर्ज दिले गेले आहे.

कामगार व रोजगार मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार पीएमएमवायने 2015 ते  2018 पर्यंत 1.12  कोटी निव्वळ अतिरिक्त रोजगार निर्मितीला  मदत केली आहे .

***

MC/SK/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1710029) Visitor Counter : 275