कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय अंतर्गत प्रशिक्षण महासंचालनालयाने क्राफ्ट इन्स्ट्रक्टर प्रशिक्षण योजना (सीआयटीएस)  2019-2020 च्या  अखिल भारतीय व्यापार चाचणीचे निकाल जाहीर केले

Posted On: 06 APR 2021 6:03PM by PIB Mumbai

 

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई) अंतर्गत प्रशिक्षण महासंचालनालयाने (डीजीटी)  आज सीआयटीएस शैक्षणिक सत्र 2019-2020 चे अखिल भारतीय व्यापार चाचणीचे (एआयटीटी) निकाल जाहीर केले.  2019-20 च्या सत्रासाठी देशभरातील 79 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेत 34 व्यापार आणि 45 संस्थांमधील एकूण 7,535 प्रशिक्षणार्थीनी परीक्षा दिली.  जयपूरच्या राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेच्या ड्रेस मेकिंग व्यापारातील प्रशिक्षणार्थी सावित्रीने 95.44% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. एकूण 242 प्रशिक्षणार्थींनी 90% आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवले आणि 80.57% उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले.  निकाल : https://ncvtmis.gov.in/Pages/CFI/Home.aspx . येथे उपलब्ध आहेत.

कोरोनामहामारीमुळे  कोविड नियमांचे कठोर पालन करून  ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2020 मध्ये दोन बॅचमध्ये लेखी आणि प्रात्यक्षिक  परीक्षा घेण्यात आल्या.

कौशल्य प्रशिक्षणात करिअर करण्याची इच्छा बाळगणार्‍या आयटीआय प्रशिक्षणार्थींना डीजीटी क्राफ्ट्स इन्स्ट्रक्टर प्रशिक्षण योजनेअंतर्गत (सीआयटीएस)  क्राफ्ट्स इन्स्ट्रक्टर प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देते.  कुशल मनुष्यबळाला  प्रशिक्षण देण्यासाठी व्यवहारिक कौशल्य तंत्राची ओळख करून देण्यासाठी कौशल्य आणि प्रशिक्षण पद्धतीचे  व्यापक प्रशिक्षण प्रशिक्षक प्रशिक्षणार्थींना दिले जातेवर्षभराच्या सीआयटीएस  प्रशिक्षणानंतर 34 व्यापार प्रकारांसाठी डीजीटीमार्फत अखिल भारतीय व्यापार चाचणी (एआयटीटी) ऑनलाईन घेतली जाते.

यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करताना, डीजीटी महासंचालक (प्रशिक्षण)  नीलमशमी राव म्हणाल्या, भारताला जगाची कौशल्य राजधानी बनवण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या अनुषंगाने  सीआयटीएस तज्ञ कौशल्य प्रशिक्षक तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हेच प्रशिक्षक नंतर तळागाळातील लोकांना  कौशल्य प्रशिक्षण देतील.  या परीक्षेत महिलांनी चांगली कामगिरी केली असून यातून  महिला सबलीकरणावर आपला भर प्रतिबिंबित होतो.

बहुपर्यायी  प्रश्न (एमसीक्यू) असलेली ही चाचणी, उमेदवारांच्या व्यापार ज्ञानाची तपासणी करते. प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तीच्या कौशल्याची चाचणी घेण्यासाठी प्रॅक्टिकल परीक्षा घेतली जाते ज्यात बाहेरचे परीक्षकतज्ञ, प्रशिक्षणार्थींच्या कामगिरीचे मूल्यांकन करतात. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना राष्ट्रीय क्राफ्ट इन्स्ट्रक्टर प्रमाणपत्र (एनसीआयसी) प्रदान केले जाते.

सर्व व्यवसायांसाठी अव्वल क्रमांक पटकावलेल्या उमेदवारांची  यादी https://www.dgt.gov.in  संकेतस्थळावर  आणि एनएसटीआय आणि आरडीएसडीईच्या सर्व संकेतस्थळावर  https://dgt.gov.in/central-institutes-lists  उपलब्ध आहे

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1709894) Visitor Counter : 316