कायदा आणि न्याय मंत्रालय

न्यायमूर्ती नुदलापाटी वेंकटा रामणा यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती

Posted On: 06 APR 2021 3:08PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपतींनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 च्या नियम (2)  द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा उपयोग करून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश  न्यायमूर्ती नुदलापाटी वेंकटा रामणा   यांना सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केले. यासंदर्भातली  अधिसूचनाकायदा व न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाने  आज जारी केली आहे. नियुक्तीचे  वॉरंट व नियुक्तीच्या अधिसूचनाची प्रत  न्यायमूर्ती एन. व्ही. रामणा  यांना देण्यात आली आहे.

24 एप्रिल 2021 रोजी न्यायमूर्ती नुदलापाटी वेंकटा रामणा हे  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.  ते 48 वे सरन्यायाधीश असतील.

त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय , केंद्रीय आणि आंध्र प्रदेश प्रशासकीय न्यायाधिकरण आणि  सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे.  त्यांनी घटनात्मक, नागरी, कामगार, सेवा आणि निवडणुकांच्या विषयांवर विशेष काम केले आहे .

सुरुवातीच्या काळात  आंध्र प्रदेशचे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून सेवा देण्यापूर्वी हैदराबाद येथील केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात विविध सरकारी संघटनांचे पॅनेल वकील आणि रेल्वेचे अतिरिक्त स्थायी वकील म्हणून ते काम पाहत होते.

17.02.2014 पासून न्यायमूर्ती नुदलापाटी वेंकटा रामणा यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यांनी 7 मार्च 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. 27.11.2019 पासून ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत.

सुरुवातीला त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे स्थायी  न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1709848) Visitor Counter : 596