अर्थ मंत्रालय
भारतीय शेअर बाजारांमध्ये 2,74,034 कोटी रुपये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकीचा (एफपीआय) ओघ
Posted On:
06 APR 2021 2:36PM by PIB Mumbai
वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये भारतीय शेअर बाजारांमध्ये 2,74,034 कोटी रुपये इतका परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकीचा (एफपीआय) ओघ वाढला आहे. यातून परकीय गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत पायावरील दृढ विश्वास दिसून येतो.
FY 2020-21
|
Net investment in Equity (in Rs Crs)
|
April
|
-6884
|
May
|
14569
|
June
|
21832
|
July
|
7563
|
August
|
47080
|
September
|
-7783
|
October
|
19541
|
November
|
60358
|
December
|
62016
|
January
|
19473
|
February
|
25787
|
March
|
10952
|
Total for FY 20-21
|
274034
|
Up to 1st April 2021; source: NSDL
नाविन्यपूर्ण विविध प्रोत्साहन उत्तेजन पॅकेजेस आणि अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने अर्थव्यवस्था सुधारल्यामुळे एफपीआय ओघ वाढला आहे. अलिकडच्या काळात सरकार आणि नियामकांनी देखील परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकीसाठी सहज प्रवेश आणि पूरक वातावरण सुधारण्याच्या दृष्टीने प्रमुख धोरणात्मक उपक्रम हाती घेतले होते.
जागतिक बँक, आयएमएफ आणि कित्येक जागतिक संशोधन संस्थांनी आर्थिक वर्ष 2021-22 मधील भारताच्या वाढीचा अंदाज 10 टक्क्यांहून अधिक राहील असा अंदाज वर्तवला आहे आणि नजीकच्या भविष्यातही भारत गुंतवणूकीचे आकर्षक केंद्र राहील असे नमूद केले आहे.
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709836)
Visitor Counter : 274