गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या सुरक्षा दलाच्या वीर जवानांना जगदलपूर येथे श्रद्धांजली वाहिली

Posted On: 05 APR 2021 9:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2021 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगढ़मध्ये नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या सुरक्षा दलाच्या वीर जवानांना आज जगदलपूर येथे श्रद्धांजली वाहिली.  देश तुमचे शौर्य व त्याग कधीही विस्मरणात जाऊ देणार नाही. देश तुमच्या दुःख कोसळलेल्या कुटुंबियांसोबत आहे, असे उद्गार अमित शाह यांनी शहीद सुरक्षा दल जवानांना सलाम करताना काढले.  हा अशांततेसोबतचा लढा आम्ही शेवटाला नेण्यास कटीबद्ध आहोत असेही शाह यावेळी म्हणाले.

Image

3 एप्रिलच्या सुरक्षा दलाच्या जवानांवरील नक्षलवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर डाव्या विचारसरणीच्या कडवेपणातून उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात आढावा घेण्यासाठी, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जगदलपूर येथे एक बैठक झाली. या बैठकीनंतर माध्यमप्रतिनिधींशी बोलताना अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,  भारत सरकार आणि संपूर्ण देशाच्या वतीने शहीद झालेल्या छत्तीसगढ़ पोलीस, सीआरपीएफ आणि कोब्रा तुकडीच्या जवानांना आपण श्रद्धांजली वाहत आहोत, असे सांगितले.

Image  Image

नक्षलवादाविरुद्धचा लढा तर्कसंगत अंतापर्यंत नेण्यास मोदी सरकारची प्राथमिकता असल्याचे अमित शाह यांनी यावेळी सांगितले. गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांसोबतचा लढा एका निर्णायक टप्प्याला पोचला असून त्या बाबतचा आमचा निर्धार या हल्ल्यानंतर अधिक दृढ झाला आहे असे ते म्हणाले.  “ तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी देशासाठी केलेले बलीदान देश कधीही विसरणार नाही”, असे उद्गार यावेळी अमित शाह यांनी शहीद जवानांच्या कुटुंबांना उद्देशून काढले. 

Image

* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1709736) Visitor Counter : 150