संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाची जहाजे आणि विमाने "ला पेरुस" सरावात होणार सहभागी
Posted On:
05 APR 2021 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2021
भारतीय नौदलाची जहाजं आयएनएस सातपुडा (हेलिकॉप्टरसह) आणि पी 8 आय लाँग रेंज सागरी गस्त विमा नासह आयएनएस किल्तान प्रथमच ला पेरुस बहुपक्षीय सरावात सहभागी होत आहेत; पूर्व हिंद महासागर प्रदेशात 05 ते 07 एप्रिल 2021 या कालावधीत हा सराव आयोजित करण्यात आला आहे. फ्रेंच नौदल (एफएन), रॉयल ऑस्ट्रेलियन नौदल (आरएएन), जपान मेरीटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (जेएमएसडीएफ) आणि अमेरिकन नौदल (यूएसएन) च्या जहाजे व विमानांसह भारतीय नौदलाची जहाजे व विमान समुद्रात तीन दिवस सराव करतील.
फ्रेंच नौदलाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या ला पेरूस सरावात एफएन शिप्स टोनेर हे जमीन आणि पाण्यात चालणारे जहाज आणि सर्कुफ युद्धनौका सहभागी होणार आहे. डॉक शिप सोमरसेट सरावात युनायटेड स्टेट्स नेव्हीचे प्रतिनिधित्व करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या नौदलाने सरावात भाग घेण्यासाठी अँझाक ही युद्धनौका आणि सिरियस टँकर तैनात केले आहे, तर जपानच्या नौदलाचे प्रतिनिधित्व विनाशिका अकेबोनो करत आहे. जहाजांव्यतिरिक्त, जहाजांवर तैनात हेलिकॉप्टरदेखील या सरावात भाग घेतील.
"ला पेरूस" या जटिल आणि प्रगत नौदल कसरतींमध्ये जमिनीवरून युद्ध, हवाई विरोधी युद्ध आणि हवाई संरक्षण कसरती, शस्त्रास्त्र गोळीबार सराव, क्रॉस डेक फ्लाइंग ऑपरेशन्स, रणनीति, यांचा समावेश आहे.
या सरावात मित्र देशांच्या नौदलातील समन्वय आणि आंतर-कार्यक्षमतेचे दर्शन घडवले जाईल. या सरावात भारतीय नौदलाचा सहभाग सागरी स्वातंत्र्य आणि मुक्त, सर्वसमावेशक हिंद- प्रशांत क्षेत्र आणि नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रति वचनबद्धता सुनिश्चित करणारी सामायिक मूल्ये दर्शवत आहे.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709699)
Visitor Counter : 1160