पंतप्रधान कार्यालय

माजी केंद्रीय मंत्री श्री. दिग्विजयसिंह झाला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

प्रविष्टि तिथि: 04 APR 2021 11:27AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, माजी केंद्रीय मंत्री श्री.  दिग्विजयसिंह झाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

 

एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "माजी केंद्रीय मंत्री श्री. दिग्विजयसिंह झाला जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले.  गुजरात आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. त्यांनी केलेल्या समाजसेवेबद्दल आणि  पर्यावरणाप्रति असलेल्या आवडीबद्दल ते स्मरणात राहतील.  त्यांच्या कुटुंबियांप्रति  संवेदना. ओम शांती. "

***

 

 MC/Sonal Chavan/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1709464) आगंतुक पटल : 252
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam