आदिवासी विकास मंत्रालय

माय जीओव्ही डॉट इनच्या सहकार्याने ट्रायफेडकडून “ बी द ब्रँड ऍम्बॅसॅडर ऑफ ट्राईब्स इंडिया” आणि “बी ए फ्रेंड ऑफ ट्राईब्स इंडिया” स्पर्धांचा प्रारंभ

Posted On: 03 APR 2021 3:58PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाने(ट्रायफेड) माय जीओव्ही डॉट इन या नागरिक- सरकार संवाद मंचाच्या सहकार्याने “ बी द ब्रँड ऍम्बॅसॅडर ऑफ ट्राईब्स इंडिया” आणि “बी ए फ्रेंड ऑफ ट्राईब्स इंडिया” या दोन मनोरंजक स्पर्धा सुरू केल्या आहेत. आदिवासी कला, संस्कृती आणि जीवनशैली यांना प्रोत्साहन देण्याच्या मुख्य उद्देशाने या स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. “ बी द ब्रँड ऍम्बॅसॅडर ऑफ ट्राईब्स इंडिया” या स्पर्धेअंतर्गत देशभरातील ग्राहकांकडून आदिवासी उत्पादनांशी संबंधित अनुभवकथन मागवले आहे.

 

Graphical user interface, applicationDescription automatically generatedGraphical user interface, application, websiteDescription automatically generated

या कथनामध्ये सदर उत्पादन वापराबाबतचा त्याचा/ तिचा अनुभव अधोरेखित केला पाहिजे आणि हे उत्पादन त्यांनी कोणत्या ठिकाणी/ दुकानातून खरेदी केले त्याचा तपशील असला पाहिजे. हे कथन 30 सेकंदांपासून 5 मिनिटांपर्यंतच्या व्हिडिओंच्या स्वरुपात असणे गरजेचे आहे. या आदिवासी उत्पादनांमध्ये पुरुष किंवा महिलांची वस्त्रप्रावरणे, दागिने, विविध प्रकारची सामग्री, चित्रे, कलात्मक धातूकाम, टेराकोटा आणि भांडी, सुशोभीकरणाच्या वस्तू, खाद्यपदार्थ आणि सेंद्रीय पदार्थ, वेत आणि बांबूच्या वस्तू, स्टेशनरी, लाकडी सामान, घरातील वस्तू, पक्वान्ने इत्यादींचा समावेश असू शकेल याविषयीची माहिती पाठवणाऱ्यांनी ती यूट्युबवर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या लिंकच्या स्वरुपात पाठवणे आवश्यक आहे.

Graphical user interface, websiteDescription automatically generatedGraphical user interface, websiteDescription automatically generated

ही स्पर्धा 14 मे 2021 पर्यंत सुरू राहील. 50 प्रवेशिकांची निवड करण्यात येईल आणि त्यांना सर्व ट्राईब्स इंडिया शोरुम्स आणि ट्राईब्सइंडिया डॉट कॉमवर वापरता येणारी गिफ्ट वावचर पुरस्कार म्हणून देण्यात येतील. याबाबतचा अधिक तपशील https://www.mygov.in/task/be-brand-ambassador-tribes-india/ या ठिकाणी उपलब्ध आहे.

फेब्रुवारी महिन्यात मायजीओव्हीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या पहिल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेला मिळालेल्या यशामुळे ट्रायफेडने या प्रश्नमंजुषेची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे. “बी ए फ्रेंड ऑफ ट्राईब्स इंडिया” असे या स्पर्धेचे नाव असून 2 एप्रिल, 2021 पासून ती मायजीओव्हीवर लाईव्ह सुरू करण्यात आली आहे. या प्रश्नमंजुषेमधील 50 विजेत्यांना सर्व ट्राईब्स इंडिया शोरुम्स आणि ट्राईब्सइंडिया डॉट कॉमवर वापरता येणारी गिफ्ट वावचर पुरस्कार म्हणून देण्यात येतील. ही प्रश्नमंजुषा https://quiz.mygov.in/quiz/be-a-friend-of-tribes-india-2021/ या लिंकवर उपलब्ध आहे.

देशाच्या लोकसंख्येमध्ये आदिवासींची लोकसंख्या 8 टक्के आहे, मात्र, ते समाजातील उपेक्षित घटकांपैकी एक आहेत.

आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील नोडल संस्था असलेली ट्रायफेड आदिवासींची जीवनशैली आणि परंपरा टिकवून त्यांच्या उपजीविकेची साधने आणि त्यांचे उत्पन्न यात सुधारणा करण्याचे प्रयत्न करत आहे. या संस्थेकडून मायजीओव्हीच्या सहकार्याने होणारे हे प्रयत्न, स्थानिक उत्पादनांना महत्त्व देणाऱ्या आणि स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचा पंतप्रधानांचा दृष्टीकोन असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाला अनुसरून आहेत.

 

Jaydevi PS/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1709332) Visitor Counter : 284