श्रम आणि रोजगार मंत्रालय
मुखमीत एस भाटिया यांनी ईएसआयसीच्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
01 APR 2021 4:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2021
भारतीय प्रशासकीय सेवेतील मुखमीत एस भाटिया यांनी आज नवी दिल्ली येथील मुख्यालयात कामगार व रोजगार मंत्रालय अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.
भाटिया हे झारखंड केडरच्या 1990 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालय अंतर्गत आर्थिक व्यवहार विभागात अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यांना जिल्हा व राज्यस्तरीय संघटनांचा कारभार व व्यवस्थापनाचा अफाट अनुभव आहे. झारखंड सरकारमध्ये कामगार आणि रोजगार आणि महिला व बालविकास विभागात त्यांनी प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
भाटिया यांनी मद्रास विद्यापीठातून संरक्षण व सामरिक अभ्यासामध्ये एम.फिल, दिल्ली विदयापीठातून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी, केंब्रिज,अमेरिका येथून इंटरनॅशनल डेव्हलपमेंटमध्ये मास्टर्स केले आहे. पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालय, चंदीगड येथून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यांनी प्रशासन आणि सामाजिक संरक्षण विषयांमध्ये संशोधन केले आहे.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709002)
Visitor Counter : 335