वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
औद्योगिक स्वयंउद्योजकता करार प्रक्रिया कागदविरहित करण्यासाठीचे अद्ययावतीकरण पूर्ण
Posted On:
30 MAR 2021 4:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मार्च 2021
उद्योगपूरक वातावरण वाढवण्यासाठी आणि अधिक पारदर्शकता आणण्याच्या हेतूने, उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग- DPIIT ने आपल्या औद्योगिक स्वयंउद्योजकता करार (IEM) पोर्टलचे नूतनीकरण केले आहे. यानुसार, अद्ययावत पोर्टलवर एका कंपनीला एकच IEM करता येणार असून, त्यावरच कंपनीचे इतर सर्व लोकेशन्स आणि विभाग दिसणार आहेत.
या एकाच फॉर्मवर, पहिल्या भागात गुंतवणुकीच्या योजना (IEM-Part A) भरता येतील आणि दुसऱ्या भागात, उत्पादन केव्हा सुरु करणार, याविषयीची माहिती (IEM-Part B) देता येईल. या करारातील काही दुरुस्त्या/बदल देखील ऑनलाईन स्वरुपात विनासायास करता येतील. या संपूर्ण प्रक्रियेच्या अद्ययावतीकरणामागे, एकाच माहिती पुनः पुन्हा भरण्यासाठी लागणारा वेळ आणि कागदोपत्री कामे वाचवण्याचा हेतू आहे.
या बाबतच्या सर्व मंजुऱ्या इमेल आणि एसएमएसच्या माध्यमातून पाठवल्या जात असून सगळे व्यवहार कागदविरहित करण्याचा हा प्रयत्न आहे. हीच माहिती संबंधित राज्य सरकारांना देखील पाठवली जाते. G2B पोर्टल, http://services.dipp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यावरून आवेदनपत्रे भरता येतील आणि IEM- औद्योगिक स्वयंउद्योजकता करार प्रमाणपत्र मिळवता येईल.
उद्योग क्षेत्रातील स्वयंउद्योजकांना, औद्योगिक विकास आणि नियमन कायदा, 1951 अंतर्गत, IEM प्रमाणपत्र देण्यासाठी, DPIIT मार्फत G2B पोर्टल चालवले जाते.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1708476)
Visitor Counter : 314