उपराष्ट्रपती कार्यालय

होळीनिमित्त उपराष्ट्रपतींनी दिल्या जनतेला शुभेच्छा

Posted On: 29 MAR 2021 11:02AM by PIB Mumbai

उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी देशातल्या जनेतला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रंगांचा उत्सव असलेल्या होळीच्या पवित्र सणाच्या देशातल्या जनतेला शुभेच्छा, असे उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. 

संपूर्ण देशभरात आनंद आणि उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण म्हणजे  चांगल्याचा वाईटावर विजय आणि आपला आनंद देशातल्या प्रत्येकासमवेत साजरा करण्याचे प्रतिक होय.वसंत ऋतूच्या या काळातला विविध रंगांचा हा संगम, आपली विविधरंगी संस्कृती आणि सामायिक सांस्कृतिक मुल्ये यांचे आपल्याला स्मरण करून देतो.

आपल्या देशात सण आणि उत्सव हे नेहमीच कुटुंब आणि आप्तेष्टांनी एकत्र जमून साजरे केले जातात. मात्र यावेळी कोविड-19 महामारीमुळे नागरिकांनी, कोविड विषयक आरोग्याच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करत हा सण साजरा करावा असे आवाहन  त्यांनी नागरिकांना केले आहे.  

हा सण आपल्या जीवनात शांतता,सलोखा,भरभराट  आणि आनंद घेऊन येवो अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

***

MC/NC/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 



(Release ID: 1708258) Visitor Counter : 209