भारतीय निवडणूक आयोग
विविध राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभांच्या पोट निवडणुका- मतदानोत्तर कल बंदी
Posted On:
26 MAR 2021 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मार्च 2021
लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 126A च्या पोट-कलम (1) अन्वये अधिकारांचा उपयोग करताना भारतीय निवडणूक आयोगाने 27 मार्च, 2021 (शनिवार) रोजी सकाळी 7:00 वाजल्यापासून आणि 29 एप्रिल, 2021 (गुरुवार) सायंकाळी 7.30 पर्यंतचा कालावधी अधिसूचित केला आहे. या कालावधीत आयोगाने 26 फेब्रुवारी, 2021 आणि 16 मार्च, 2021 रोजी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूका आणि विविध राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभांच्या पोट निवडणुकांदरम्यान मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने मतदानोत्तर कल प्रकाशित करणे किंवा जाहीर करणे प्रतिबंधित असेल.
उपरोक्त सार्वत्रिक निवडणुका आणि पोट-निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात संबंधित मतदान क्षेत्रातील मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी निश्चित केलेल्या 48 तासांच्या कालावधीत लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 126(1)(b) अंतर्गत कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमात कोणत्याही मतदानाचे सर्वेक्षण किंवा इतर कोणत्याही सर्वेक्षण पाहणीच्या निकालासह कोणतीही निवडणूक बाब दर्शविणे प्रतिबंधित असेल.
या संदर्भात दि. 24 मार्च 2021 रोजीची अधिसूचना सर्व संबंधित लोकांच्या माहितीसाठी येथे जोडली आहे.
निवडणूक आयोगाची अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
M.Chopade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707893)
Visitor Counter : 223