संरक्षण मंत्रालय
कोरियाचे संरक्षण मंत्री 25-27 मार्च, 2021 दरम्यान भारत दौऱ्यावर
Posted On:
25 MAR 2021 10:52AM by PIB Mumbai
कोरियाचे संरक्षण मंत्री सु वूक 25-27 मार्च 2021 दरम्यान भारत दौर्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर नवी दिल्ली येथे द्विपक्षीय बैठक घेतील आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांसह भारत-कोरिया संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करतील. दिल्ली कॅंटोन्मेंट येथे इंडो-कोरियन फ्रेंडशिप पार्कचे उद्घाटनही उभय देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते केले जाईल.
भारत दौऱ्यात कोरियाचे संरक्षण मंत्री आग्र्यालाही भेट देणार आहेत.
ST/SK/CY
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1707471)
Visitor Counter : 221