आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

जनुकीय अनुक्रमाच्या माध्यमातून INSACOG ने भारतात नोवेल कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याचे समोर आणले आहे

Posted On: 24 MAR 2021 3:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मार्च 2021


द इंडियन सार्स -सीओव्ही-2 कॉनसॉर्टीअम ऑन जिनॉमिक्स (INSACOG) या 10 राष्ट्रीय प्रयोगशाळांच्या संघाची स्थापना भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 25/12/2020 रोजी केली.  तेव्हापासून INSACOG जनुकीय अनुक्रमाच्या माध्यमातून कोविड-19 विषाणूचे संक्रमण आणि  महामारीच्या सावरुपातले विविध बदल याचे विश्लेषण आणि अभ्यास करत आहे. विविध विषाणूंमधे आढळत असलेले जनुकिय प्रकार हा साधारणत: सर्व देशांमधला समान घटक आहे.

या संशोधनात INSACOG ने काही महत्वाच्या नोंदी केल्या आहेत, यात 771 दखलपात्र प्रकार, variants of concerns (VOCs) एकूण  10787 सक्रिय रुग्णांच्या नमुन्यात आढळले आहेत. हे नमुने राज्य आणि केन्द्रशासित प्रदेशांनी तपासासाठी दिले होते. तसेच यात  736 इंग्लंडमधल्या  जनुकीय प्रकारचे (B.1.1.7) आढळले. दक्षिण आफ्रिकेतला विषाणू प्रकार (B.1.351) असलेले 34 नमुने आढळले . एकामध्ये ब्राझिलमधल्या  (P.1) विषाणूचा प्रकार आढळला. 

या  VOC सहितचे नमुने देशातल्या 18 राज्यांमधे आढळले आहेत. 

महाराष्ट्रातल्या विषाणू नमुन्यांचे विश्लेषण केले असता डिसेंबर 2020च्या तुलनेत E484Q आणि L452R नमुन्यांच्या उत्परिवर्तनात वाढ झाली असल्याचे पुढे आले आहे. अशा उत्परिवर्तनामुळे रोग प्रतिकारकशक्तीपासून विषाणूचा बचाव होतो आणि रोगाचा प्रसार होतो.सुमारे 15-20% नमुन्यांमधे असे उत्परिवर्तन आढळून आले असून आधीच्या कोणत्याही नोंद असलेल्या व्हिओसी बरोबर त्याचे साम्य नाही.

यास व्हीओसी म्हणून वर्गीकृत केले आहे. परंतु राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी “ चाचण्या वाढवणे, रुग्णांच्या संपर्कांत आलेल्यांचा व्यापक मागोवा घेणे, कोरोनाग्रस्त व संपर्कांत आलेल्यांनाचे त्वरित विलगीकरण करणे तसेच राज्यांनी  राष्ट्रीय उपचार नियमांनुसार उपचार करणे ”  आवश्यक आहे.

संबंधित व्हीओसी आणि नवीन उत्परिवर्तन प्रकार भारतात सापडले आहेत, मात्र त्यांचे प्रमाण इतके नाही की काही राज्यांमधील वाढत्या संक्रमणासाठी त्यांचा थेट संबंध जोडला जावा. परिस्थितीचे पुढील विश्लेषण करण्यासाठी जनुक अनुक्रम आणि साथीच्या रोगांचा अभ्यास चालू  आहे.


* * *

M.Chopade/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1707224) Visitor Counter : 442