पंतप्रधान कार्यालय
डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
23 MAR 2021 9:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. राम मनोहर लोहिया यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
“थोर स्वातंत्र्यसैनिक आणि समाजवादी विचारवंत डॉ.राम मनोहर लोहिया यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. लोहिया यांनी त्यांच्या ज्वलंत आणि प्रगतीशील विचारांनी देशाला नवी दिशा दाखविण्याचे महान कार्य केले. देशासाठी त्यांनी दिलेले योगदान सर्व देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहील,” असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्वीट संदेशात म्हटले आहे.
***
ST/SC/CY
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1706840)
आगंतुक पटल : 350
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam