रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

पर्यटक वाहन चालकांसाठी नवीन योजना जाहीर


ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केल्यांनतर, 30 दिवसांच्या आत मिळणार परवाना

3 महिन्यांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक 3 वर्षांसाठी परवाना दिला जाईल.

यावर्षी 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार

पर्यटनाला सुलभ चालना मिळेल, राज्याच्या महसुलात वाढ होईल

Posted On: 14 MAR 2021 9:00AM by PIB Mumbai

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक नवीन योजना जाहीर केली आहे, या योजनेअंतर्गत  कोणतेही पर्यटक वाहन चालक  ऑनलाइन पद्धतीने “अखिल भारतीय पर्यटक प्राधिकरण / परवाना ” साठी अर्ज करू शकतात. अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून  30 दिवसांच्या आत संबंधित कागदपत्रे सादर केल्यानंतर आणि शुल्क जमा झाल्यानंतर परवाना जारी केला जाईल. '' अखिल भारतीय पर्यटक वाहन  प्राधिकृत आणि परवाना नियम  2021” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या  नवीन नियमांचा सामान्य वैधानिक आदेश 166( इ) 10 मार्च  2021 रोजी प्रकाशित झाला आहे.  नवीन नियम १ एप्रिल २०२१ पासून लागू होतील.सर्व विद्यमान परवाने त्यांच्या वैधतेपर्यंत लागू राहतील.

      या नवीन नियमांमुळे आपल्या देशातील विविध  राज्यांमधील पर्यटनाला दूरगामी चालना मिळणे अपेक्षित आहे. , यासह राज्य सरकारांच्या महसुलातही वाढ होईल.  परिवहन विकास परिषदेच्या 39 व्या आणि 40 व्या  बैठकीत उचलण्यात आलेल्या या पावलांवर चर्चा झाली आणि आणि या परिषदेत सहभागी राज्यातील प्रतिनिधींकडून याबाबत प्रशंसा करण्यात आली  आणि सहमती झाली.  मालवाहतूक वाहनांना राष्ट्रीय परवाना पद्धतीअंतर्गत यशस्वीरीत्या आणल्यानंतर मंत्रालयाने , पर्यटक प्रवासी वाहनांची वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने   हे नवीन नियम जारी केले . .

          याशिवाय , तीन महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा  एका वेळी तीन वर्षांपर्यंतच्या  कालावधीसाठी, प्राधिकृत  / परवान्याच्या  स्वरूपात ही योजना परिवर्तनाची अनुमती देते.आपल्या देशात पर्यटनाचा हंगाम मर्यादित आहे आणि त्यादृष्टीने ज्या वाहन चालकांकडे मर्यादित आर्थिक क्षमता आहे अशा बाबींना  लक्षात घेऊन ही तरतूद समाविष्ट केली गेली आहे. यामुळे  प्राधिकृत / परवाना संदर्भातील केंद्रीय  संकलित माहिती आणि शुल्क एकत्रित करून पर्यटकांची ये- जा , सुधारणेला वाव आणि पर्यटनाला चालना देण्याची संधी मिळेल .

       गेल्या पंधरा वर्षात आपल्या देशात  प्रवास आणि पर्यटन उद्योग अनेक पटीने वाढला असून त्यादृष्टीने ही पावले उचलण्यात आली आहेत . या वाढीमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे योगदान आहे आणि ग्राहकांच्या अनुभवाचा कल आहे.

******

Jaydevi PS/SC/CY

******

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704697) Visitor Counter : 325