वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

आर्थिक आणि व्यापार विषयक बाबींसंदर्भातील ब्रिक्स संपर्क गटाची पहिली बैठक संपन्न

Posted On: 12 MAR 2021 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2021
 

आर्थिक आणि व्यापार विषयक बाबींसंदर्भातील ब्रिक्स संपर्क गटाची (CGETI) पहिली बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9-11 मार्च 2021 रोजी संपन्न झाली. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या 5 देशांची  संघटना असलेल्या ब्रिक्सची यंदाच्या वर्षासाठी संकल्पना आहे ब्रिक्स@15: ब्रिक्स देशांदरम्यान अखंडता, दृढता आणि सर्वसहमती यासाठी सहकार्य (BRICS@15:Intra BRICS Cooperation for Continuity Consolidation and  Consensus)

भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स आर्थिक आणि व्यापार विषयक बाबींसंदर्भातील ब्रिक्स संपर्क गटाच्या 2021 मधे होणाऱ्या कार्यक्रमांची दिनदर्शिका सादर करण्यात आली, ज्यात तातडीने पूर्ण होतील असे प्राध्यान्य क्षेत्र ठरवणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग गोलमेज परीषद, सेवा सांख्यिकी कार्यशाळा तसेच ब्रिक्स व्यापार मेळावा यांचे वेळापत्रक आणि व्याप्ती निश्चित करणे यांचा समावेश होता. आर्थिक आणि व्यापार विषयक बाबींसंदर्भातील ब्रिक्स संपर्क गटाच्या भारत सरकारच्या अध्यक्षतेदरम्यान पूर्ण करता येतील अशा बाबीविषयीचे भारत सरकारच्या विविध संबंधित विभागांनी तयार केलेले सादरीकरण निरनिराळ्या सत्रांत प्रस्तावित केले.

या सादरीकरणात (i) रशियाच्या 2020 मधील ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कालावधीत  स्वीकारलेल्या ‘ब्रिक्स आर्थिक भागिदारी 2025 रणनीती’ या दस्तावेजावर आधारीत कृती आराखडा (ii) जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) ट्रिप्स (TRIPS) सवलत प्रस्तावासह बहुआयामीय व्यापार प्रणालीबाबत ब्रिक्स सहकार्य (iii) ई कॉमर्स प्रणालीतील ग्राहक संरक्षणासाठी चौकट तयार करणे (iv) शुल्करहित उपाययोजना ठराव यंत्रणा (v) स्वच्छता आणि शारिरीक आरोग्य स्वच्छता कार्य यंत्रणा [SPS] (vi) अनुवांशिक संसाधने आणि पारंपरिक ज्ञानाच्या संरक्षणासाठी सहकार्याची चौकट (vii) व्यावसायिक सेवा  सहकार्यासाठी ब्रिक्सची संरचना

या पूर्ण होण्यायोग्य  विषय/ बाबींवर आधारित सादरीकरण करण्यत आले. या प्रत्येक सादरीकरण सत्रानंतर त्यावरील अभिप्राय आणि प्रतिक्रिया सत्रे घेण्यात आली. 

कोरोना विषयक  सद्यस्थितीतही भारताने या गटासाठी  दिलेला वेळ आणि अनुकूल अशा प्रकारे उपक्रमांचं नियोजन याविषयी ब्रिक्स भागीदार देशांनी भारताची प्रशंसा केली तसेच भारताने प्रस्तावित केलेल्या विविध उपक्रमांतून एकत्रपणे कार्य करायला ब्रिक्सच्या भागीदार देशांची सहमती दर्शविली. सप्टेंबर 2021 पर्यंत ब्रिक्स समूहातील देशांचे सहमती होईपर्यंत आंतरसत्रीय बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.सीजीईटीआयसाठी कार्य करणारे अधिकारी जून 2021मधे होणाऱ्या  27 व्या सीजीईटीआयच्या अधिकृत स्तरावरील बैठकीसाठी कार्य करणे सुरू ठेवतील.


* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1704359) Visitor Counter : 299