आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत वाढ कायम
आज सकाळी 7 पर्यंत 1.66 कोटी पेक्षा जास्त लसींचे डोस दिले
गेल्या 24 तासांत सुमारे 1 दशलक्ष डोस दिले
Posted On:
04 MAR 2021 11:45AM by PIB Mumbai
महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णांच्या आकड्यामध्ये वाढ नोंदविली जात आहे. गेल्या 24 तासांत नोंदवलेल्या नवीन रुग्णांपैकी 85.51% रुग्ण या राज्यातील आहेत.
गेल्या 24 तासांत 17,407 नवीन रुग्णांची नोंद झाली झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक 9,855 दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 18 ऑक्टोबरला नोंद झालेल्या 10,259 नवीन रुग्णांनंतर महाराष्ट्रातील ही सर्वाधिक रुग्ण संख्येची नोंद आहे.
त्याखालोखाल केरळमध्ये 2,765 तर पंजाबमध्ये 772 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
भारतातील एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज 1,73,413 वर पोहोचली आहे. भारतातील सध्याच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण हे भारताच्या एकूण बाधित रुग्णांच्या 1.55% आहे.
महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशात सक्रिय रुग्ण संख्येत वाढ दिसून येत आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार 3,23,064 सत्रांद्वारे 1.66 कोटी (1,66,16,048) पेक्षा जास्त लसींचे डोस दिले आहेत. गेल्या 24 तासांत 89 मृत्यूची नोंद झाली आहे.
नवीन मृत्यूंपैकी 88.76% मृत्यू हे सहा राज्यात झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 42 मृत्यू झाले आहेत.
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702412)
Visitor Counter : 266