आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ


मोठया संख्येने सक्रिय रुग्णसंख्या दर्शवणाऱ्या राज्यांना सावधगिरीचा सल्ला

सुमारे 1.5 कोटी लोकांना कोविड 19 प्रतिबंधक लस देण्यात आली

गेल्या 24 तासांत 19 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात कोविड19 मुळे एकाही मृत्यूची नोंद नाही

Posted On: 02 MAR 2021 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मार्च 2021

 

गेल्या 24 तासांत देशात 12,286 नवीन रुग्ण आढळल्यामुळे आज भारताची एकूण सक्रिय रुग्णसंख्या 1.68 लाख  (1,68,358) झाली आहे. देशातील सध्याच्या सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.51 टक्के आहे.

नवीन रुग्णांपैकी 80.33% रुग्ण 5 राज्यांमधील आहेत.

महाराष्ट्रात दररोज सर्वाधिक रुग्ण आढळत असून गेल्या 24 तासात 6,397 नवे रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल केरळमध्ये 1,938 तर पंजाबमध्ये 633 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये एकूण सक्रिय रुग्णांपैकी 67.84 % रुग्ण आहेत .

ज्या राज्यांमध्ये सक्रिय रुग्ण  जास्त आहेत  आणि दररोज नवीन कोविड रुग्ण आढळत आहेत अशा  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी केंद्र सरकार नियमितपणे संपर्क साधत आहे. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सतत कठोर दक्षता पाळण्याचा सल्ला राज्यांना / केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आला आहे. प्रभावी चाचणीची आवश्यकता, सर्वसमावेशक ट्रॅकिंग, सकारात्मक घटनांमध्ये त्वरित अलगीकरण आणि जवळच्या संपर्कांत आलेल्यांचे त्वरित अलगीकरण  यावर भर दिला जात आहे.

आठ राज्यांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे.

देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 84.16 टक्के रुग्ण पाच राज्यांमध्ये आहेत.  भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी  एकट्या महाराष्ट्रात 46.82 टक्के रुग्ण आहेत तर केरळमध्ये 28.61  टक्के रुग्ण आहेत.

सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा साप्ताहिक सकारात्मकता दर हा  राष्ट्रीय सरासरी दर 2.00% पेक्षा अधिक आहे. साप्ताहिक सकारात्मकतेच्या दरात  10.02% सह सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत हाती आलेल्या अंदाजित आकडेवारीनुसार  एकूण 1,48,54,136 लसींचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी   67,04,613 आरोग्य कर्मचाऱ्यांना  (एचसीडब्ल्यू)  प्रथम डोस25,97,799 आरोग्य कर्मचाऱ्यांना (दुसरा डोस) आणि, 53,44,,4533 फ्रंटलाइन कामगार (एफएलडब्ल्यू) यांना प्रथम डोस मिळाला आहे, 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील अन्य  आजार असलेल्या 24,279 लाभार्थीना तसेच  60 वर्षांहून अधिक वयोगटातील 1,82,992 लोकांना लस देण्यात आली आहे.

ज्या लाभार्थ्यांनी पहिला डोस मिळाल्यानंतर 28 दिवस पूर्ण केले आहेत त्यांच्यासाठी कोविड 19 लसीकरणाचा दुसरा डोस देण्याचा टप्पा 13 फेब्रुवारी2021 रोजी सुरू झाला . आघाडीवरच्या कर्मचाऱ्यांसाठी  लसीकरण 2 फेब्रुवारी 2021 रोजी सुरू झाले.

आतापर्यंत 1.07 कोटी (1,07,98,921) पेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 12,464 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे. भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.07% असून  जगातील सर्वोच्च दरांपैकी एक  आहे.

काल बरे झालेल्या रुग्णांपैकी 86.55 % रुग्ण  6 राज्यांमध्ये आहेत.

महाराष्ट्रात काल एका दिवसात 5,754 इतक्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे झाले.  गेल्या 24 तासांत केरळमध्ये 3,475 लोक बरे झाले आणि त्याखालोखाल  तामिळनाडूमध्ये 482 लोक बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांत 91 मृत्यूची नोंद झाली आहे.

नवीन मृत्यूंपैकी 85.71 टक्के मृत्यू सहा राज्यांमध्ये झाले आहेत.  महाराष्ट्रात सर्वाधिक 30 मृत्यू झाले आहेत. पंजाबमध्ये  18 तर  केरळमध्ये 13 मृत्यूची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत एकोणीस राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये  कोविड19 मुळे एकही  मृत्यूची नोंद झालेली नाही. ही राज्ये आहेत-  पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, ओदिशा झारखंड, उत्तराखंड, बिहार, लक्षद्वीप, लडाख (केंद्रशासित प्रदेश ), सिक्कीम, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम, मेघालय, नागालँड, अंदमान आणि निकोबार  बेटे, दमण आणि दीव  आणि दादरा आणि नगर हवेली  आणि अरुणाचल प्रदेश

 

U.Ujgare/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1701933) Visitor Counter : 231