पर्यटन मंत्रालय

‘देखो अपना देश’ या मोहिमेअंतर्गत पर्यटन मंत्रालयाच्या वतीने टाळेबंदी नंतरच्या काळात देशातील विविध पर्यटन स्थळांच्या मौलिक ठेव्याचे प्रदर्शन

Posted On: 28 FEB 2021 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2021

 

भारत आता टाळेबंदीच्या नंतरच्या काळात असून, पर्यटन मंत्रालय  आणि त्याची  विभागीय  कार्यालये 'देखो अपना देश' या मोहिमेअंतर्गत भारतातील विविध पर्यटन स्थळांच्या मौलिक ठेव्याचे आणि उत्पादनांचे प्रदर्शन करत असून  पर्यटनाबाबत हितसंबंधी आणि नागरिकांमधे  पर्यटन जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे

(भारतीय पर्यटन कार्यालय-कोची)

पर्यटन मंत्रालयाच्या भारतीय पर्यटन विभाग, कोची कार्यालय आणि केरळ होम स्टे आणि टुरिझम सोसायटी(HATS) यांनी एकत्रितपणे पर्यटन मंत्रालयाच्या  घरगुती निवास/बी अँड बी युनिट मालकांना पर्यटनविषयक विविध योजनाविषयी अवगत करण्यासाठी नुकतीच एक कार्यशाळा  आयोजित केली होती. या कार्यशाळेत निधी आणि साथी(NIDHI &SAATHI) या आतिथ्य उद्योगासाठी सुरू केलेल्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक ती माहिती देण्यात आली.

(भारतीय पर्यटन कार्यालय-बंगळुरू)

भारतीय पर्यटन विभाग, बंगळुरू कार्यालयाने दिनांक 22 फेब्रुवारी 2021 रोजी बंगळुरू येथे देखो अपना देश या उपक्रमाअंतर्गत उत्तरप्रदेशातील बौद्ध वारसा स्थळाविषयी  आणि तीर्थक्षेत्र पर्यटन क्षमता यांची माहिती देण्यासाठी  स्थानिक पर्यटन रोड शो चे आयोजन केले होते.

भारतीय पर्यटन विभाग, मुंबई कार्यालय  दिनांक 23-24 फेब्रुवारी 2021रोजी पुणे येथे झालेल्या इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट (IITM)यात सहभागी झाला होता आणि त्यात अभ्यागतांना भारतातील विविध पर्यटनस्थळांचे प्रदर्शन दाखवित माहितीचे  मार्गदर्शन केले. इंडिया टुरिझम मुंबई सहभागी होत असलेले पश्चिम विभागातील हे अशा प्रकारचे दुसरे प्रदर्शन आहे ज्यात पर्यटन स्थळे पुन्हा सुरू होऊन प्रत्यक्ष सहभाग घेणे शक्य झाले आहे.

(भारतीय पर्यटन कार्यालय हैद्राबाद आणि वाराणसी)

दिनांक 24 फेब्रुवारी 2021 रोजी हैद्राबाद येथे पर्यटन मंत्रालयाच्या हैद्राबाद आणि वाराणसी कार्यालयांनी संयुक्तपणे देखो अपना देश या उपक्रमाअंतर्गत 'उत्तरप्रदेशला भेट द्या' या कार्यक्रमाचे आयोजन केले.

(रतीय पर्यटन कार्यालय दिल्ली)

पर्यटन मंत्रालयाच्या भारतीय पर्यटन दिल्ली कार्यालयाने सुंदर नर्सरी येथे प्रादेशिक स्तरावर पर्यटन मार्गदर्शकांचा उत्साह वाढवण्यासाठी    एकदिवसीय सहलीचे आयोजन केले ज्यात 70 प्रादेशिक पर्यटन  मार्गदर्शकांनी (RLG)सहभाग घेतला.यावेळी विभागीय संचालकांनी  देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालय घेत असलेल्या पुढाकाराबद्दल  माहिती दिली आणि आरएलजींनी त्यांचे अनुभव कथन करावे,असे आवाहन केले.

(कार्यालय- भारतीय पर्यटन, गुवाहाटी)

पर्यटन मंत्रालयाच्या भारत पर्यटन कार्यालयाने गुवाहाटी येथे नदी पर्यटन या विषयावर दिनांक 22 फेब्रुवारी 2021 रोजी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत 35 हितसंबंधित उपस्थित होते आणि यात ईशान्य विभाग आणि भारतातील नदीवरील जलपर्यटन या विषयावर भर दिला गेला.


* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701560) Visitor Counter : 179