ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचे अनुमानित विश्लेषण आणि देखरेख यादृष्टीने भारताचे महत्त्वपूर्ण पाऊल


22 अत्यावश्यक वस्तूंच्या किंमत देखरेखीकरिता ग्राहक व्यवहार विभागाने सुरू केलेल्या मोबाईल अँपद्वारे देशभरातल्या 127 ठिकाणांहून घाऊक आणि किरकोळ किमतींबाबतची प्रत्यक्ष माहिती पुरवणे सुरू

अॅपमुळे अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतींचे परीक्षण आणि भाकीत विश्लेषण शक्य

डीईएने किंमत देखरेख आणि विश्लेषण सुधारण्यासाठी तांत्रिक सहाय्यासाठी डोओसीएच्या प्रस्तावाला मान्यता दिली

Posted On: 28 FEB 2021 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2021

 

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचे अनुमानित विश्लेषण आणि देखरेख यादृष्टीने भारतात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. 22 अत्यावश्यक वस्तूंच्या  किंमत देखरेखीकरिता ग्राहक व्यवहार  विभागाने सुरू केलेल्या मोबाईल अॅपद्वारे  देशभरातल्या  127 ठिकाणांहून घाऊक आणि किरकोळ किमतींबाबतची प्रत्यक्ष माहिती पुरवणे  सुरू झाले आहे. 

किंमत  अहवाल केंद्रांकडून दररोजच्या  किंमतींच्या आकडेवारीची गुणवत्ता सुधारण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने 1 जानेवारी 2021 रोजी एक मोबाइल अॅप सुरू केले.

किंमत  देखरेख व विश्लेषण सुधारण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) केयर्स कार्यक्रमांतर्गत  तांत्रिक सहाय्यता निधीसाठी विभागाने  डीईएकडे  प्रस्तावही मांडला  आहे. तांत्रिक साहाय्याअंतर्गत  किंमत देखरेख  पोर्टलची श्रेणी सुधारणा, किंमत अहवाल केंद्रे आणि किंमत देखरेख कक्षाची क्षमता बांधणी, खाद्यवस्तू पुरवठा साखळीसाठी आवश्यक  दीर्घकालीन सुधारणा   आणि बाजारातील कार्यक्षमता ओळखणे, या बाबींचा समावेश आहे.  डीईएने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

ग्राहक व्यवहार विभाग तांदूळ, गहू, चणा डाळ, तूर  डाळ, उडद डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, साखर, दूध, भुईमूग तेल, मोहरी तेल, वनस्पती, सोया तेल, सूर्यफूल तेल, पाम तेल, गूळ, चहा, मीठ, बटाटा, कांदा आणि टोमॅटो, या 22 आवश्यक वस्तूंच्या किंमतीवर देखरख ठेवतो.

देशभरातील राज्य अन्न आणि नागरी पुरवठा विभागात कार्यरत 127 किंमत अहवाल केंद्रांकडून किरकोळ आणि घाऊक किमतींचा अहवाल दररोज प्राप्त होतो. अतिरिक्त साठ्यातून काही साठा काढणे, निर्यात-आयात धोरण इत्यादीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी दरांचा दैनिक अहवाल आणि सूचक किंमतीच्या कलाचे  विश्लेषण केले जाते. 

जियो टैग आधारित  डाटामुळे कुठल्या ठिकाणांहून दर आकडेवारी पाठवली जात आहे ते कळू शकते. जियो-टैग अ‍ॅपमध्ये सरासरी किंमती मोजण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी अंतर्निहित  वैशिष्ट्य आहे.

मोबाइल अॅपच्या माध्यमातून कार्यालयीन डेस्कटॉपमधून स्थिर आकडेवारीचा  अहवाल  नाकारला  जातो. म्हणूनच मोबाइल अॅप कार्यान्वित करण्याची अट अशी आहे की प्रत्येक किंमत अहवाल केंद्राने ज्या दुकाने आणि बाजारपेठेतून दररोज किंमतीचे  संकलन केले जात आहे त्या दुकाने आणि बाजारपेठेचे नाव, पत्ता असे  तपशील द्यावेत.

किरकोळ किंमतीच्या अहवालाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एकाच वस्तूच्या किंमती, उच्च उत्पन्न बाजार, मध्यम उत्पन्न बाजार आणि निम्न उत्पन्न बाजार अशा तिन्ही बाजारपेठांमधून संकलित होणे आणि तीन किंमतींच्या सरासरीचे वृत्तांकन होणे आवश्यक आहे. मोबाइल अॅपमध्ये गणना आणि सरासरी किंमतीची अहवाल देण्यासाठी अंतर्निहित वैशिठ्य आहे. हे गणनेत मानवी चुका टाळण्यास मदत करते.

अ‍ॅगमार्कनेट, अ‍ॅग्रीवॉच, नाफेड आणि ट्रेड असोसिएशनकडील बाजारपेठेतील माहितीदेखील किंमतीच्या विश्लेषणासाठी उपयुक्त ठरते. विभाग,अ‍ॅग्रीवॉचकडील सेवांचा बाजार गुप्तवार्ता पुरवण्यात, किमतींचे अनुमानित विश्लेषण आणि किंमत अंदाज प्रारूप विकसित करण्यासाठी उपयोग करून घेत आहे.


* * *

Jaydevi PS/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701550) Visitor Counter : 211