माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माहिती तंत्रज्ञान (माध्यमांसाठीची मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल मिडिया नीतिमूल्ये संहिता) नियम,2021 अंतर्गत मजकूर अवरोधित करणे

Posted On: 27 FEB 2021 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2021
 

माहिती तंत्रज्ञान (माध्यमांसाठीची मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल मिडिया नीतिमूल्ये संहिता) नियम,2021अन्वये, डिजिटल मिडीया व्यवस्थेतील बातम्या प्रसारित करणारे तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म चालवणाऱ्यांसाठी संस्थात्मक आराखडा तयार करण्यात आला आहे.या नियमावलीतील भाग तीन मधल्या नियम क्रमांक 16 विषयी काही चुकीचे अन्वयार्थ काढले जाऊन गैरसमज पसरवले जात आहेत. या नियमान्वये, आपत्कालीन परिस्थितीत, काही मजकूर अवरोधित करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण सचिवांकडून जारी केले जाऊ शकतात.

या संदर्भात हे स्पष्ट करण्यात येत आहे की, ही तरतूद, इलेक्ट्रोनिक्स आणि माहित तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांसाठी असलेल्या अधिकारांप्रमाणेच, समान असून, माहिती तंत्रज्ञान (माहिती/मजकूर सार्वजनिकरित्या प्रसारित होऊ नये, यासाठी अवरोधित करण्यासाठीची प्रक्रिया आणि संरक्षण) नियम 2009 अन्वये, गेली 11 वर्षे सचिवांना हे अधिकार आहेत.

या नियमावलीचा भाग तीन माहिती आणि प्रसारणक्षेत्राच्या अधिकारक्षेत्रातील बाब असल्यामुळे या ठिकाणी, माहिती तंत्रज्ञान सचिवांच्या ऐवजी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांचा उल्लेख करण्यात आला आहे.

अशा प्रकारची कुठलीही नवी तरतूद करण्यात आलेली नाही.


* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1701377) Visitor Counter : 330