आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केरळ, महारष्ट्र, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये सक्रीय रुग्ण संख्येत वाढ

Posted On: 27 FEB 2021 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2021

 

भारताची एकूण सक्रिय रुग्ण संख्या आज 1,59,590 वर पोहोचली आहे. भारतातील सध्याच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण भारताच्या एकूण बाधित रुग्णांच्या 1.44% इतके आहे.

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये मागील 24 तासांत नवीन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णसंख्येत सर्वाधिक 8,333 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ केरळमध्ये 3671 आणि पंजाबमध्ये 622 नवीन रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासांत 16,488 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. नव्या रुग्णांपैकी 85.75% रुग्ण हे 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001OXHD.jpg

गेल्या दोन आठवड्यांत केरळमध्ये सक्रीय रुग्ण संख्येत सर्वाधिक घट निदर्शनाला आली आहे. 14 फेब्रुवारी रोजी असलेल्या 63,8477 रुग्ण संख्येवरून आज हा आकडा 51,679 इतका झाला आहे, तर याच काळात महाराष्ट्रात सक्रीय रुग्ण संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे, 14 फेब्रुवारी 34,449 रुग्ण संख्येत वाढ होऊन सध्या हा आकडा 68,810 वर पोहोचला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002LWV6.jpg  https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003BLAV.jpg

तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगाल या  राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये होत असलेल्या रुग्ण संख्येतील वाढीच्या पार्श्वभूमीवर  कॅबिनेट सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय आढावा बैठक होणार आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0049Z6C.jpg

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार 2,92,312 सत्रांद्वारे एकूण 1,42,42,547 लसींचे डोस देण्यात आले आहेत. यात 66,68,974 एचसीडब्ल्यू (1ला डोस), 24,53,878 एचसीडब्ल्यू (दुसरा डोस) आणि 51,19,695 एफएलडब्ल्यू (1 ला डोस) यांचा समावेश  आहे.

कोविड-19 लसीचा पहिला डोस घेऊन ज्या लाभार्थ्यांचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे अशा लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा दुसरा डोस 13 फेब्रुवारी पासून द्यायला सुरुवात केली आहे. 2 फेब्रुवारी 2021 पासून एफएलडब्ल्यूचे लसीकरण सुरू झाले.

लसीकरण मोहिमेच्या (27 फेब्रुवारी, 2021) 42 व्या दिवसापर्यंत एकूण7,64,904 लसींचे डोस देण्यात आले. त्यापैकी 3,49,020 लाभार्थ्यांना (एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यू) 13,397 सत्रांमध्ये पहिला डोस आणि 4,20,884 एचसीडब्ल्यूंना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

भारतात दिलेल्या लसीच्या दुसऱ्या एकूण डोसपैकी 62.75 टक्के डोस आठ राज्यांमध्ये देण्यात आले आहे.  भारतातील एकूण लसीच्या दुसर्‍या डोसपैकी एकट्या उत्तर प्रदेशात 12.64% (3,10,058) लसीचे डोस देण्यात आले आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00521F9.jpg

अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, लडाख, चंदीगड, नागालँड, पंजाब आणि पुडुचेरी 9 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी नोंदणीकृत आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांपैकी 60% पेक्षा कमी जणांना लसीचा पहिला डोस दिला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0062ZSC.jpg

लडाख, उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, ओदिशा, त्रिपुरा, मध्यप्रदेश, गुजरात, लक्षद्वीप, राजस्थान, केरळ आणि दादरा आणि नगर हवेली या 12 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी आघाडीवर काम करणाऱ्या एकूण कामगारांपैकी 65% पेक्षा जास्त कामगारांचे लसीकरण केले आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007YFMJ.jpg

पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे, मेघालय, आसाम, तामिळनाडू, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, तेलंगणा, पंजाब, नागालँड, गोवा आणि मिझोरम या 12 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी आघाडीवर काम करणाऱ्या एकूण कामगारांपैकी 40% पेक्षा कमी जणांचे लसीकरण केले आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00895IH.jpg

आतापर्यंत एकूण 1.07 कोटी (1,07,63,451) लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 12,771 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. भारताचा रुग्ण बरे होण्याचा 97.17 % दर हा जगातील सर्वाधिक रुग्ण बरे होणाऱ्या देशांपैकी एक आहे.

नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी 84.79% रुग्ण हे 6 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील  आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक 4,936 नवीन रुग्ण एकाच दिवशी बरे झाले आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 4,142 आणि त्यानंतर कर्नाटकमध्ये 642 रुग्ण बरे झाले आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image009ZLA8.jpg

गेल्या 24 तासांत 113 मृत्यूची नोंद झाली आहे.

नवीन मृत्युपैकी 82.3% मृत्यू हे सहा राज्य/केंद्र प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक (48) मृत्यू झाले आहेत. मागील 24 तासात पंजाबमध्ये दररोज 15 आणि केरळमध्ये 14 मृत्यूची नोंद झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image010W7P4.jpg

गुजरात, ओदिशा, चंडीगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, पुडुचेरी, मणिपूर, मिझोरम, लक्षद्वीप, लदाख (केंद्रशासित प्रदेश), सिक्कीम, दमन व दिव आणि दादरा आणि नगर हवेली, अंदमान आणि निकोबार बेटे, त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या सतरा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली नाही.


* * *

S.Tupe/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701319) Visitor Counter : 223