उपराष्ट्रपती कार्यालय

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन उपराष्ट्रपतींनी केला अभिनव पध्दतीने साजरा


उपराष्ट्रपतींचे 22 भारतीय भाषांमध्ये ट्विट आणि 24 प्रादेशिक वृत्तपत्रात मातृभाषेच्या उन्नतीचे महत्व सांगणारे लेख

मातृभाषा दिनानिमित्त आयोजित तीन समारंभात सहभाग

Posted On: 21 FEB 2021 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2021

 

उपराष्ट्रपती एम वैंकेंय्या नायडू यांनी आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन अभिनव पद्धतीने साजरा केला. त्यांनी 22 भारतीय भाषांमध्ये ट्विटर संदेश पाठवला याशिवाय मातृभाषेच्या उन्नतीचे महत्व सांगणारे लेख 24 प्रादेशिक वृत्तपत्रात लिहीले.

उपराष्ट्रपती हे मातृभाषेच्या उन्नतीचे पुरस्कर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या संस्कृतीचा पाया असणाऱ्या गोष्टींपैकी भाषिक वैविध्य ही एक गोष्ट आहे असे आपल्या ट्विटमध्ये नमूद करत भाषा ही फक्त आपल्यामध्ये संवाद साधण्याचे साधनच नाही तर ती आपल्याला आपली परंपरेशी जोडून ठेवत आपली सामाजिक-सांस्कृतिक ओळख म्हणून काम करते असे नायडू यांनी म्हटले आहे.

प्राथमिक शिक्षणापासून ते राज्यव्यवस्थेपर्यंत सर्व वर्तुळात मातृभाषेचा वापर वाढवण्याचे आवाहन करत उपराष्ट्रपतींनी आपले विचार आणि कल्पनांना आपल्या भाषेत सृजनात्मकरित्या व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

नायडू यांनी तेलुगू, तामिळ, हिंदी, गुजराथी, कश्मीरी, कोंकणी, मराठी, उडिया, उर्दू, मल्याळम, कन्नड, पंजाबी, नेपाळी, आसामी, बंगाली, मणिपुरी, बोडो, संथाळी, मैथिली,डोंगरी न संस्कृत या भाषांमधून ट्विटर संदेश पोस्ट केले.

उपराष्ट्रपतींनी लिहीलेले लेख टाईम्स ऑफ इंडिया (इंग्लिश), दैनिक जागरण (हिंदी), इनाडू (तेलुगू), दिना थंथी (तामिळ), लोकमत (मराठी), समाज (उडिया), सिय़ासत (उर्दू), आदाब तेलंगणा (उर्दू), आसामिया प्रतिदिन (आसामी), नवभारत टाईम्स (मैथिली), मातृभूमी (मल्याळम), दिव्य भास्कर (गुजराती), बर्तमान (बंगाली), भानगर भुई (कोंकणी), हाय्येनी रदाब (बोडो) संथाल एक्स्प्रेस (संथाली), हिमाली बेला (नेपाळी), हमरो वार्ता (नेपाळी), दैनिक मिरमिरै ( नेपाळी), हमरो प्रजा शक्ती (नेपाळी), हिंदू (सिंधी), ज्योती डोगरी (डोगरी), दैनिक कहावत (काश्मिरी), डेला संग्रमाल (काश्मिरी) आणि सुधारणा (संस्कृत ) या वृत्तत्रातून प्रसिद्ध झाले.

आंतरराष्ट्रीय भाषा दिन साजरा करण्यासाठी शिक्षण मंत्रालय व सांस्कृतिक मंत्रालय यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्येही नायडू यांनी आभासी पद्धतीने भाग घेतला. हैदराबादच्या स्वर्ण भारत ट्रस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचेही ते प्रमुख पाहुणे होते. यानंतर उत्तर अमेरिकेच्या तेलुगू असोसिएशनने आयोजित केलेल्या ‘मातृभाषोभव’ या कार्यक्रमाला ते आभासी उपस्थिती लावतील.

याआधी 16 फेब्रुवारी 2021 रोजी उपराष्ट्रपतींनी सर्व संसद सदस्यांना मातृभाषेला प्रोत्साहन देण्याबाबत लेखी विनंती केली होती.

 

Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1699768) Visitor Counter : 188