संरक्षण मंत्रालय

स्वमग्न विकाराबाबत जनजागृती करण्यासाठी 12 वर्षाच्या जिया राज या मुलीने 36 किलोमीटर पोहण्याचा करण्याचा केला विक्रम

Posted On: 18 FEB 2021 5:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021

कुमारी जिया राय या 12 वर्षांच्या मदन राय या नौदल कर्मचार्याच्या  मुलीने बांद्रा - वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंतचे 36 किलोमीटर अंतर दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजी 08 तास 40 मिनिटात  पोहत पार करून विक्रम नोंदवला .ही मुलगी  स्वतः  स्वमग्नता विकारग्रस्त (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर, ASD) असून हा जलतरणाचा विक्रम तिने स्वमग्नता विकाराबद्दल जनजागृती करण्यासाठी केला आहे.या विक्रमासाठी तिने दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पहाटे 03:50 वाजता बांद्रा-वरळी सी लिंक येथून प्रारंभ केला आणि दुपारी 12:30 वाजता तिने गेट वे ऑफ इंडियाइथे पोहोचली. हा उपक्रम भारतीय जलतरण परीषदेच्या  महाराष्ट्र जलतरण संस्था  या मान्यताप्राप्त संस्थेच्या निरिक्षणाखाली घेण्यात आला. युवा आणि क्रीडा व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या फिट इंडिया या मोहिमेचे सहकार्य देखील या उपक्रमाला लाभले.

याचा पारितोषिक समारंभ दिनांक 17 फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे झाला. कुमारी जिया हिला ग्रेटर मुंबई अँमेच्युअर अँक्वेटिक असोसिएशन (GMAAA)च्या अध्यक्ष श्रीमती झरीर एन बालीवाला यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले.

कुमारी जिआ राय हिने यापूर्वी दिनांक15 फेब्रुवारी 20 रोजी एलिफंटा बेट ते गेटवे ऑफ इंडिया हे 14 किलोमीटर अंतर 03 तास 27 मिनिटात आणि 30 सेकंदात पोहत जाऊन पार केले आहे आणि स्वमग्न विकार असलेली 14 किलोमीटर जलतरण करणारी सर्वात लहान मुलगी असा विश्वविक्रम नोंदविला आहे.

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1699081) Visitor Counter : 295