सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

देवेंद्र कुला वेलारार समाजाला अनुसूचित जातीमधून वगळण्याविषयीच्या बातमीच्या संदर्भात सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाचे स्पष्टीकरण

Posted On: 15 FEB 2021 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021

 

देवेंद्र कुला वेलारार समाजाला अनुसूचित जातीमधून वगळण्याबाबत प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या या पूर्णपणे निरर्थक आहेत असे सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने म्हटले आहे.

मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की ही बातमी दिशाभूल करणारी असून वास्तविकतेला धरून नाही. त्यात म्हटले आहे की देवेंद्र कुला वेलारारमध्ये अनुसूचित जातींच्या (7) समुदायांचे वर्गीकरण करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून ते तामिळनाडूच्या अनुसूचित जातीच्या यादीतील एक घटक असेल. म्हणूनच, त्यांना अनुसूचित जातींमधून वगळून इतर मागासवर्गीय बनविले जाईल हे विधान पूर्णपणे चुकीचे आहे आणि हे स्पष्ट केले जाऊ शकते की हे विधान वास्तविकता प्रतिबिंबित करत नाही.

मंत्रालयाने पुढे स्पष्टीकरण दिले आहे की अनुसूचित जातींच्या समुदायाला (7) तामिळनाडूच्या अनुसूचित जातींच्या यादीमध्ये देवेंद्र कुला वेलारार म्हणून वर्ग करण्याचे विधेयक यापूर्वीच लोकसभेत सादर करण्यात आले आहे.

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1698164) Visitor Counter : 157