वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आव्हानांना न जुमानता एप्रिल-डिसेंबर, 2020 मध्ये तृणधान्‍यांच्‍या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली

Posted On: 10 FEB 2021 4:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2021

 

आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तीन तिमाहीत तांदूळ, गहू आणि भरड धान्याच्या  निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे.

एप्रिल ते डिसेंबर, 2020 च्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी याच काळात कडधान्यांची  निर्यात 32,591 कोटी रुपयांवरून (4581 US$ दशलक्ष )  49,832 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. कडधान्य  निर्यातीतील वाढ रुपयानुसार 52.90% आणि अमेरिकन डॉलर नुसार 45.81 % वाढ झाली आहे. कृषी व प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) च्या अनुसूचित उत्पादनांच्या एकूण निर्यातीत कडधान्य निर्यातीचे एकूण मूल्य  रुपयानुसार 48.61% होते.

अशा टप्प्यामध्ये जिथे जागतिक पातळीवर कोविड19 महामारीमुळे  अनेक वस्तूंचा पुरवठा खंडित झाला आहे, तांदूळ निर्यातीतील लक्षणीय वाढ सरकारच्या प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे. कोविड  संबंधित सर्व सुरक्षा खबरदारी घेत तांदळाची निर्यात सुनिश्चित करण्यासाठी सरकारने त्वरित अनेक  उपाययोजना केल्या .

तांदळाच्या निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने अपेडा अंतर्गत भात निर्यात प्रोत्साहन मंच  (आरईपीएफ) स्थापन केला होता. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड आणि ओदिशा या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांमधील तांदूळ उद्योग, निर्यातदार, अपेडाचे अधिकारी आणि कृषी संचालक यांचे प्रतिनिधी या मंचात आहेत.


अधिक माहितीसाठी क्लिक करा 


* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1696789) अभ्यागत कक्ष : 235