पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        एलपीजी सिलिंडरवरील अनुदान सोडले
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                10 FEB 2021 3:30PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2021
तेल विपणन  कंपन्यांनी (ओएमसी) माहिती दिली आहे की  01.02.2021 पर्यंत 1.08 कोटी एलपीजी ग्राहकांनी आपले अनुदान सोडले आहे.
देशात एलपीजीसह  पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील संबंधित उत्पादनांच्या किंमतीशी जोडल्या आहेत. मात्र सरकारने अनुदानित घरगुती एलपीजीसाठी ग्राहकांना प्रभावी किंमतीत सवलत कायम ठेवली आहे. आणि  ग्राहकांना अनुदानित दराने ही उत्पादने मिळतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उत्पादनाच्या किंमतीत वाढ / घट नुसार तसेच  अनुदानाबाबत सरकारच्या निर्णयाप्रमाणे  देशांतर्गत अनुदानित एलपीजी वरील अनुदानात वाढ/घट होत असते.
केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत आज लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1696745)
                Visitor Counter : 245