आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने विविध वाहतूक संघटनांना मास्क आणि साबणांचे वितरण
Posted On:
08 FEB 2021 7:56PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली विविध वाहतूक संघटनांना मास्क आणि साबणांचे वितरण करण्यात आले.

“कोविड -19 प्रतिसाद उपक्रमांचा भाग म्हणून मास्क वितरित करण्याच्या उपक्रमाचा भाग होताना मला खूप आनंद झाला आहे. देशभरात अशा प्रकारचे वितरण केले जात आहे, असे ते म्हणाले.

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या प्रयत्नांची दखल घेत लस विकसित केल्यानंतरही कोविड योग्य वर्तनाच्या गरजेवर भर देताना डॉ हर्ष वर्धन म्हणाले, “कोविड प्रतिबंधासाठी आपल्याच देशात तयार केलेली लस मंजूर झाल्याचे अधोरेखित करताना मला आनंद होत आहे. भारत सरकारने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम यापूर्वीच सुरू केली आहे. परंतु ही लस आहे याचा अर्थ असा नाही की आपण आत्मसंतुष्ट असावे. खरं तर, सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन आपण सर्वांनी आता आणि नजीकच्या भविष्यात देखील केले पाहिजे. हे लक्षात घेता, आयआरसीएसने प्रतिबंधात्मक दृष्टीकोनातून मास्क वितरण सुरू ठेवले हे कौतुकास्पद आहे. ”
अशा वितरणाचे महत्त्व अधोरेखित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “मास्क वितरण हे मास्क आणि हाताच्या स्वच्छतेचे प्रतीक आहे. रस्ते वाहतूक चालक आणि मदतनीस देशभर प्रवास करत असतात आणि त्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. आयआरसीएसद्वारे वितरित केले जाणारे मास्क कोविड संसर्ग रोखण्यात मोठी मदत करतील. ”

भारतातील कोविड परिस्थितीबद्दल बोलताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, “संपूर्ण जगात भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक दरांपैकी एक आहे. बाधित रुग्णसंख्या देखील कमी होत आहे आणि आज ही संख्या 1.48 लाख इतकी आहे.
लसीबाबत चुकीची माहिती आणि अफवा यासंदर्भात बोलताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले , “बरेच लोक लसीशी संबंधित चुकीची माहिती आणि अफवा पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.”
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1696291)
Visitor Counter : 169