कंपनी व्यवहार मंत्रालय

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एमसीए 21 आवृत्ती 3.0 चा शुभारंभ

Posted On: 05 FEB 2021 4:56PM by PIB Mumbai

 

आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान, कंपनी व्यवहार मंत्रालय (एमसीए) डेटा विश्लेषण संचालित एमसीए21 आवृत्ती 3.0 सुरु करेल.

एमसीए21 व्ही3 हा प्रकल्प तंत्रज्ञानाद्वारे संचालित होणारा भविष्यकालीन प्रकल्प असून यामध्ये अंमलबजावणीला बळकटी देण्यासाठी, व्यवसाय सुलभीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी, वापरकर्त्याचा अनुभव वाढविण्यासाठी, नियामकर्त्यांमधील अखंड एकत्रीकरण आणि डेटा आदानप्रदान सुविधा प्रदान करण्याचा विचार करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि एमएलसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासह जागतिक सर्वोत्तम कार्यपद्धतींचा एकत्रित विचार करून, एमसीए21 व्ही3 हा प्रकल्प भारतातील कॉर्पोरेट नियामक वातावरणामध्ये बदल घडवून आणण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 दरम्यान सुरू करण्यात येणाऱ्या एमसीए21 चे प्रमुख घटक खालीलप्रमाणे:

ई-सुरक्षा: एमसीए केंद्रीय छाननी कक्ष (सेंट्रल स्क्रूटनी सेल) स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे, जे कॉर्पोरेट्सनी एमसीए21 वर नोंदणी (रजिस्ट्रीवर) केलेल्या काही स्ट्रेट थ्रू प्रोसेस (एसटीपी) फॉर्मची छाननी करेल आणि अधिक छाननीसाठी काही कंपन्यांची निवड करेल.

ई-निवडा: कंपनीचे निबंधक (आरओसी) आणि प्रादेशिक संचालक (आरडी) यांच्याकडे निवाड्यांच्या कार्यवाहीचे वाढते प्रमाण व्यवस्थापित करण्यासाठी ई-निवाडा मॉड्यूल संकल्पित केले आहे. हे भागधारकांना ऑनलाइन सुनावण्यांचे एक मंच प्रदान करेल आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने न्याय-निवाडा करेल.

ई-सल्लामसलत: प्रस्तावित सुधारणा आणि मसुद्याच्या नियम इत्यादींवर लोकांच्या सल्लेसुचनांची सद्य प्रक्रिया स्वयंचलित आणि वृद्धिंगत करण्यासाठी एमसीए21 व्ही3 चे ई-सल्लामसलत मॉड्यूल एक ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देईल, ज्यामध्ये बाह्य वापरकर्त्यांसाठी / अभिप्रायसाठी प्रस्तावित दुरुस्ती / मसुदा कायदे एमसीएच्या संकेतस्थळावर पोस्ट केले जातील. 

अनुपालन व्यवस्थापन प्रणाली (सीएमएस): सीएमएस एमसीएला अनुपालन न करणार्‍या कंपन्या / एलएलपी ओळखण्यास मदत करेल, या डीफॉल्ट कंपन्या / एलएलपींना ई-नोटीस बजावेल आणि एमसीएच्या अंतर्गत वापरकर्त्यांसाठी सतर्कता निर्माण करेल.

एमसीए प्रयोगशाळा: एमसीए21 व्ही3 चा एक भाग म्हणून, एक एमसीए प्रयोगशाळा स्थापित केली जात आहे, ज्यात कॉर्पोरेट कायदा तज्ज्ञ असतील. एमसीए लॅबचे प्राथमिक कार्य म्हणजे अनुपालन व्यवस्थापन प्रणालीची प्रभावीता, ई-सल्लामसलत मॉड्यूल, अंमलबजावणी मॉड्यूल इत्यादींचे मूल्यांकन करणे आणि चालू असलेल्या आधारावर त्यास वर्धित सूचना सुचविणे.

याव्यतिरिक्त, एमसीए21 व्ही3 मध्ये चॅट बॉट सक्षम हेल्पडेस्क, मोबाइल अॅप्स, परस्पर वापरकर्ता डॅशबोर्ड्स, यूआय / यूएक्स तंत्रज्ञानाचा वापर करून वर्धित वापरकर्ता अनुभव आणि एपीआयद्वारे अखंड डेटा प्रसार इत्यादी असेल.

***

S.Thakur/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695523) Visitor Counter : 218