अंतराळ विभाग

पंतप्रधानांच्या अंतराळ तंत्रज्ञानविषयक दूरदृष्टीमुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील: डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 04 FEB 2021 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2021

 

केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) , पंतप्रधान कार्यालय ,  कार्मिक, सार्वजनिक तक्रारी,निवृत्तीवेतन , अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री  डॉ जितेंद्र सिंह म्हणाले  की अंतराळ क्षेत्रात भारताच्या क्षमता विस्तारणे .  देशाला स्वावलंबी आणि तंत्रज्ञानाने प्रगत करण्यासाठी कौशल्य, क्षमता आणि सर्जनशीलता बदलणे ही  पंतप्रधानांची अंतराळ तंत्रज्ञानविषयक दूरदृष्टी आहे. आज राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना ते म्हणाले, यामुळे  अंतराळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी संधी निर्माण होतील.  खासगी क्षेत्राला मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक अवकाश तंत्रज्ञान महासत्ता  म्हणून भारत अंतराळ  मालमत्तेच्या सामाजिक-आर्थिक वापराच्या प्रगतीत  उत्प्रेरक भूमिका बजावेल.

क्षमता आणि सर्जनशील कौशल्यांचा उपयोग करतांना राष्ट्रीय संसाधनांचा उचित  वापर करण्यासाठी पुरवठाऐवजी मागणी आधारित   दृष्टिकोनात रूपांतर  आणि संशोधन  व विकास, अत्याधुनिक तंत्रज्ञान,  अंतराळ शोध, भावी  पिढीच्या क्षमतेला आकर्षित करण्याच्या उद्देशाने मानवी अंतराळ उड्डाण यावर लक्ष केंद्रित करणे यामुळे शक्य होईल.

या दूरदृष्टीमुळे वेगवान, स्वस्त आणि कार्यक्षम पद्धतीने तंत्रज्ञानाद्वारे सार्वजनिक सेवा पुरवल्यामुळे  सर्वसामान्यांना वाढीव लाभदेखील मिळू शकेल.


* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695273) Visitor Counter : 214