संरक्षण मंत्रालय

राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या 61 व्या अभ्यासवर्गाला 110 सहभागींसह सुरुवात

Posted On: 02 FEB 2021 5:07PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या (एनडीसी) 61 व्या अभ्यासवर्गाला 1 फेब्रुवारी 2021 रोजी 110 सहभागींसह सुरुवात झाली आहे. या अभ्यासवर्गात 10 सहभागींची वाढ झाली आहे. वाढलेल्या जागांपैकी बहुतांश जागा मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या परदेशी देशातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, फिलीपिन्स आणि मालदीवमधील अधिकारी बर्याच कालावधीनंतर सहभागी होत आहेत. मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांतील सहभागी हे देशाच्या प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचे प्रतिनिधी आहेत ज्यात एनडीसीने दक्षिण अमेरिका वगळता सर्व खंडातील सहभागींना सामावून घेतले आहे. तथापि, शेवटच्या एनडीसी अभ्यासवर्गात दक्षिण अमेरिके (ब्राझील) चा एक  सहभागी होता.

1960 मध्ये पहिला एनएसडी अभ्यासवर्ग आयोजित केला होता. आजमितीस या महाविद्यालयाचे 3899 माजी विद्यार्थी आहेत त्यापैकी 835 जण 69 मैत्रीपूर्ण संबध असलेल्या देशातील आहेत. नागरी सेवेसाठीच्या दोन रिक्त जागांमध्ये किरकोळ वाढ झाली असून 61 व्या एनडीसी अभ्यासवर्गात नागरी सेवेसाठीची सध्याची संख्या 19 आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

M.Iyengar/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1694454) Visitor Counter : 187