अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2021-22 पासून आगामी पाच वर्षात 13 क्षेत्रांमध्ये उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत 1.97 लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यासाठी सरकार कटिबद्ध
3 वर्षांमध्ये 7 नवीन वस्त्रोद्योग पार्क सुरू करणार
Posted On:
01 FEB 2021 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2021
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट कार्यमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेमध्ये आर्थिक वर्ष 2021-22 चे अंदाजपत्रक मांडताना, सरकार प्रमुख क्षेत्रांच्या कार्यामध्ये विस्तार करणार असून वैश्विक स्तरावर अग्रणी ठरतील असे उद्योग निर्माण करण्यासाठी योजना तयार करीत असल्याचे सांगितले. यासाठी उद्योगांना मदत करणे त्याचबरोबर युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी वर्ष 2021-22 पासून आगामी पाच वर्षांत जवळपास 1.97 लाख कोटी रुपये खर्च करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.
जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारतीय कंपन्या महत्वपर्ण भाग बनाव्यात यासाठी देशातल्या उत्पादन संस्था अत्याधुनिक बनणे गरजेचे आहे, तसेच भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची बनविण्यासाठीही महत्वपूर्ण पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी आपल्या आर्थिक क्षेत्राचा विकास दर सातत्याने दोन अंकी राहणे आवश्यक आहे, असे सांगून निर्मला सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी कंपन्यांनी तयारी केली पाहिजे, या उद्देशाने विविध 13 क्षेत्रामध्ये उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजना (पीएलआय) राबविण्याची घोषणा आज केली.
आगामी 3 वर्षांमध्ये 7 नवीन वस्त्रोद्योग पार्क सुरू करणार
वस्त्रोद्योगाला वैश्विक स्तरावरील प्रतिस्पर्धी बनविण्यासाठी आणि या उद्योगाकडे गुंतवणुकदारांना आकर्षिक करण्यासाठी त्याचबरोबर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एका विस्तृत गुंतवणूक योजना तयार केली आहे. या वस्त्रोद्योग पार्क (मित्र) योजनेअंतर्गत निर्यातीसाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत. ‘मित्र’ योजनेमधून आगामी 3 वर्षात देशात 7 नवीन वस्त्रोद्योग पार्क स्थापन करण्यात येणार आहेत, असेही निर्मला सीतारमण यांनी आज जाहीर केले.
***
Jaydevi PS/S.Bedekar/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1694217)
Visitor Counter : 224