अर्थ मंत्रालय

आयआयपी डेटामध्ये आर्थिक घडामोडींमधील व्ही-आकारातील सुधारणेची पुष्टी

Posted On: 29 JAN 2021 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2021

 

आर्थिक पाहणीत असे आढळून आले आहे की अभूतपूर्व कोविड 19 महामारी आणि आव्हाने असूनही, भारतीय अर्थव्यवस्थेचे औद्योगिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्र वेगवान 'व्ही 'आकाराच्या सुधारणेच्या मार्गावर आहेत . आर्थिक घडामोडींच्या या मजबूत व्ही-आकाराच्या सुधारणेची पुष्टी आयआयपी आकडेवारीत दिसून येते. केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला.

आयआयपी व आठ प्रमुख निर्देशांक कोविडपूर्व पातळीपर्यंत मार्गक्रमण करत असल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे. आयआयपीमध्ये व्यापक सुधारणेमुळे नोव्हेंबर -19 मधील 2.1 टक्क्यांच्या तुलनेत नोव्हेंबर -20 मध्ये (-) 1.9 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि एप्रिलमध्ये (-) 57.3 टक्क्यांची नीचांकी वाढ झाली आहे.

आर्थिक सर्वेक्षणानुसार, ही सुधारणा भारताच्या आर्थिक विकासाच्या सशक्त युगाची केवळ सुरुवात असल्याचे अपेक्षित आहे. या सर्वेक्षणात नमूद केले आहे की केंद्र सरकारने 29.87 लाख कोटी रुपये किंवा भारताच्या जीडीपीच्या 15 टक्के प्रोत्साहन पॅकेजचा समावेश असलेले एक सुधारणा पॅकेज (आत्मनिर्भर भारत अभियान) जाहीर केले होते. त्यानंतर अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी अनेक सहाय्यक उपक्रमही जाहीर करण्यात आले.

व्यवसाय अहवाल (डीबीआर), 2020 नुसार, व्यवसाय सुलभतेतील भारताचे मानांकन 2018 मधील 77 व्या स्थानावरून 2019 मध्ये 63 व्या स्थानापर्यंत सुधारले आहे. केंद्र सरकारने सध्याच्या संकटावर मात करण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चालक बनण्यासाठी एमएसएमईला सक्षम करण्यासाठी असंख्य उपक्रम हाती घेतले आहेत.

आर्थिक सर्वेक्षणात नमूद केले आहे की 6 कोटीहून अधिक एमएसएमई उद्योग असलेले हे क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि रोजगार निर्मितीत व जीडीपीत योगदान देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या क्षेत्रामध्ये 11 कोटीहून अधिक लोक रोजगारावर आहेत, जे जीडीपीमध्ये अंदाजे 30 टक्के योगदान देते आणि देशाच्या निर्यातीत निम्मे योगदान देत एक मजबूत आणि स्वावलंबी भारत बनवण्यात मदत करत आहे.

देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांपैकी एमएसएमई क्षेत्र एक होते. आर्थिक सर्वेक्षणात नमूद केले आहे की या क्षेत्राला पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारने अनेक सुधारात्मक आणि सहायक उपाययोजना केल्या आहेत.

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1693345) Visitor Counter : 247