अल्पसंख्यांक मंत्रालय

मुख्तार अब्बास नकवी यांनी राज्य वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित अभिमुखता कार्यक्रमाला केले संबोधित


देशभरातील वक्फ मालमत्तांवर सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक उपक्रम आणि कौशल्य विकास प्रकल्पांसाठी सरकारने मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत: मुख्तार अब्बास नकवी

वक्फ नोंदींच्या डिजीटायझेशनच्या आमच्या परिश्रमपूर्वक मोहिमेमुळे या वक्फ मालमत्ता मोठ्या संख्येने निहित स्वार्थ आणि वक्फ माफियाच्या तावडीतून मुक्त झाल्या आहेत : मुख्तार अब्बास नकवी

देशातील 308 जिल्हे, 870 प्रभाग, 331 शहरे आणि हजारो खेड्यांमध्ये अल्पसंख्यांकांसाठी सरकारने विकास कार्यक्रमांचा विस्तार केला आहे: मुख्तार अब्बास नकवी

जम्मू-काश्मीर आणि लेह-कारगिलमध्ये वक्फ बोर्ड स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे: मुख्तार अब्बास नकवी

“वक्फच्या मालमत्तेचे जिओ टॅगिंग / जीपीएस मॅपिंग देशातील नामांकित संस्थांकडून युद्धपातळीवर केले जात आहे.”

Posted On: 28 JAN 2021 3:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021

केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की विकासाची लाट विनाशकारी उलथापालथीतून   थांबवता येत नाही. सरकारच्या विकासाचा निर्धार , जो सन्मानासह विकास आणि भेदभावाशिवाय  विकास यावर  आधारित असून  त्याचे क्रांतिकारक परिणाम दिसून आले आहेत आणि समाजातील प्रत्येक घटक मुख्य प्रवाहातील विकासाचा समान भागीदार झाला आहे.