PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 27 JAN 2021 8:17PM by PIB Mumbai

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

Image

भारतात दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा दैनंदिन बऱ्या होणाऱ्यांची संख्या जास्त राहण्याचा कल सुरूच आहे. गेल्या 20 दिवसापासून दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा दैनंदिन बऱ्या होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

देशात बरे झालेल्यांची एकूण  संख्या 1,03,59,305 झाली आहे.

गेल्या 24 तासात देशात 13,320 रुग्ण बरे झाले.रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर आता  96.91% झाला आहे.

गेल्या काही आठवड्यात सक्रीय रुग्ण संख्येत देशाचा आलेख अभूतपूर्व दैनंदिन बदल दाखवत आहे. गेल्या 24 तासात 12,689 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.

भारतात एकूण  1,76,498 सक्रीय रुग्ण आहेत.

सक्रीय रुग्णएकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 1.65% आहेत.

केंद्र सरकारच्या तत्पर चाचण्या, शोध,उपचार,या धोरणाचा अवलंब यामुळे हा प्रोत्साहनदायी आलेख दिसत आहे. मोठ्या प्रमाणात आणि व्यापक चाचण्या, तत्पर देखरेख आणि संपर्कातल्या लोकांचा मागोवा, गृह विलगीकरणावर देखरेख, उच्च दर्जाचे औषधोपचार केंद्र सरकारकडून जारी  मार्गदर्शक सूचना यामुळे बरे होणाऱ्याची  संख्या वाढती राहिली.

केंद्र, राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांनी, रुग्णालयात प्रभावी उपचार, गृह विलगीकरणावर देखरेख, स्टिरोइडचा वापर, रुग्णांना वेळेवर आणि तत्पर उपचारासाठी रुग्णवाहिका सेवेत सुधारणा यावर लक्ष केंद्रित केले. व्हेंटीलेटर, पीपीई कीट, औषधे यांची पुरेशी संख्या सुनिश्चित करत केंद्र सरकारने, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना सहाय्य केले. आशा कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न आणि गृह विलगी करणातल्या रुग्णांसंदर्भात प्रभावी देखरेख सुनिश्चित केली.

ई संजीवनी या डिजिटल मंचामुळे टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध झाल्याने कोविड चा प्रसार रोखण्यात आणि त्याच बरोबर कोविड व्यतिरिक्त आणि अत्यावश्यक सेवा सुरु राखण्यासाठी मदत झाली. अति दक्षता विभागामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांची वैद्यकीय व्यवस्थापन  क्षमता वृद्धिंगत करण्यावरही  केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले. नवी दिल्लीतल्या एम्स मधून तज्ञांनी कोविड- 19 व्यवस्थापनाबाबत केलेले राष्ट्रीय ई आयसीयू या संदर्भात अतिशय उपयुक्त ठरले.

27 जानेवारी 2021 ला सकाळी 8  वाजेपर्यंत सुमारे 20 लाखाहून अधिक (20,29,480) लाभार्थींनी  देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियाना अंतर्गत लस घेतली.

गेल्या 24 तासात 5,671 जणांनी 194 सत्रात, लस घेतली.आतापर्यंत 36,572  सत्रे झाली आहेत.

अधिक माहितीसाठी  https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1692640

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या 148 व्या सत्राची काल व्हीडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली.

या समारोपाच्या वेळी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे 148 वे सत्र फलदायी आणि यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रतिनिधी, उपाध्यक्ष, महा संचालक, प्रादेशिक संचालक आणि संबंधितांचे आभार मानले.

ज्यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीची गरज आहे अशा लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवण्याचे आपले कार्य जारी राखण्यासाठी अनेक सदस्यांनी दिलेल्या व्यापक पाठींब्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळाल्याचे ते म्हणाले.

आपल्याकडे धोरणात्मक ढाचा आहे आणि जगभरात अनेक समस्या असूनही आपण लक्षणीय प्रगती करत आहोत यामुळेही आपल्याला प्रोत्साहन मिळत असल्याचे ते म्हणाले.

 

आपल्याला अधिक सुधारणेची आवश्यकता आहे आणि सध्याच्या परिस्थितीवर मात करण्याची गरज आहे ज्यायोगे आपण दुर्बल सदस्य राष्ट्रांमधल्या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकूया बाबी वर सर्वांचे एकमत झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

अधिक माहितीसाठी   https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1692614

 

72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्राला संदेश

 

कोविड-19 साथीच्या आजाराने आपल्याला आरोग्यासाठी चांगली खेळती हवा (व्हेंटिलेशन) आणि सूर्यप्रकाशाचे महत्त्व शिकविले असे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू म्हणाले. छोट्या जागेत वाढत असलेल्या नागरी वस्ती बद्दल नाराजी व्यक्त करताना नायडू यांनी घरे, कार्यालये, उपहारगृहे आणि संमेलन गृहांमध्ये हवेचे योग्य नियोजन सुनिश्चित करण्यास सांगितले.

 

कोविड आव्हानाशी अजूनही सामना करत असतानाच भारतीय रेल्वेच्या 1138 गाड्या सध्या धावत आहेत. यात भारतीय रेल्वेच्या विविध विभागातून दररोज धावणाऱ्या उत्सव एक्स्प्रेस गाड्यांचाही समावेश आहे. देशातील विविध महत्वाची गंतव्य स्थळे या विशेष गाड्यांद्वारे जोडली गेली आहेत. जास्तीत जास्त गाड्या रुळावर आणण्याच्या आवश्यकतेचा नियमित आढावा घेतला जात आहे.

 

अनिवासी भारतीय वैज्ञानिक समुदायासह शैक्षणिक विचारवंत, भागधारक, सायन्स इंडिया फोरमचे सदस्य आणि आखाती देशातील मान्यवर समुदायांचे सदस्य यांच्यात खुले विज्ञान धोरण, भारतातील फेलोशिप (शिष्यवृत्ती), एसटीआयपी सुसूत्रीकरण प्रक्रियेत गुंतवणूकदार आणि आखाती सहकार परिषदेतील (जीसीसी) जसे की, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, बाहरिन, संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथील अनिवासी भारतीय युवा संशोधकांसाठी असलेल्या संधी या विषयावर 22 जानेवारी 2021 रोजी चर्चा करण्यात आली.

 

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्र: महाराष्ट्रामध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 95.24 टक्के आहे; तर राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण 2.53 टक्के आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 57, 229 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. राज्यात आत्तापर्यंत 1.43 कोटी जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 14.06 टक्के जणांना कोरोना झाल्याचे आढळून आले आहे. मुंबईमध्ये कोरोना केसलोड’ 3,06,740 पर्यंत गेला आहे. दिवसभरामध्ये शहरातील 778 रूग्ण बरे झाले तर 6 जणांचे या आजाराने निधन झाले.

नवीन प्रकरणे - 2405, मृतांची संख्या - 47, बरे झालेल्या रूग्णांची संख्या -2106, सक्रिय रूग्ण - 43,811,बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या -19,17,450. मृत्यू पावलेल्यांचा एकूण आकडा -50,862. एकूण संक्रमित प्रकरणे - 20,13,353. आत्तापर्यंत चाचणी केलेल्या नमून्यांची संख्या - 1,43,00,000

FACT CHECK

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Image

 

 

 

 

Image

****

S.Kane/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1692766) Visitor Counter : 211