संरक्षण मंत्रालय
अंदमानच्या समुद्रातील संयुक्त सैनिकी सराव
Posted On:
25 JAN 2021 1:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 25 जानेवारी 2021
संयुक्तपणे चालविल्या जाणाऱ्या मोहिमांची सिद्धता वाढविण्यासाठी, भारतीय सशस्त्र दलांनी अंदमानचा समुद्र आणि बंगालच्या खाडीत “कवच” आणि “ ॲम्फेक्स -21” हा मोठ्या प्रमाणातील संयुक्त सैनिकी प्रशिक्षण सराव केला. हा सराव अंदमान आणि निकोबार कमांडच्या (ANC)नेतृत्वात केला गेला आणि त्यात पूर्व नौदल कमांड (ENC) आणि लष्कराची दक्षिणी कमांड (SC)सहभागी झाले होते. लष्कर, नौदल ,हवाई दल आणि तटरक्षक दलाची सामग्री या सरावात वापरली गेली. या सरावात ANC ची सर्व दले, लष्कराच्या दक्षिणी कमांडचे भूमी तसेच पाण्यात कार्यरत सर्व पथके तसेच कोर्वेट, पाणबुड्या, नौदलाच्या पूर्व विभागाची मोठी जहाजे आणि नौदल कमांडो यांनी भाग घेतला. भारतीय हवाई दलातील जग्वार ही हल्ले आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी विमाने आणि तटरक्षक दलातील महत्त्वाची साधने यांनी देखील यात भाग घेतला.
यावेळी भारतीय सागरी हद्दीमधील हवाई आणि नौदल हल्ल्यांच्या तयारीची क्षमता तपासण्यासाठी विविध सराव केले गेले. सर्व संबंधित संस्थांच्या समन्वयातून लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या पथकांची या सरावाआधी सागरी आणि हवाई मार्गांनी वाहतूक करण्यात आली. ज्या भागात हा सराव झाला तो भाग भारतासाठी धोरणात्मकरित्या अत्यंत महत्त्वाचा आहे.
या सरावादरम्यान, अवकाश, हवा, भूमी तसेच पाणी यामध्ये कार्यरत संस्थांकडून गुप्त माहिती मिळविण्यासाठीची क्षमता, त्या माहितीचे एकत्रीकरण, पृथ्थकरण आणि तत्पर दळणवळण यांच्यातून प्रत्यक्ष युद्धभूमीवरील पारदर्शकता आणि तातडीच्या निर्णयांसाठीची क्षमता तपासण्यात आली.
यावेळी ANC च्या कमांडर- इन-चीफ नी सरावाचे निरीक्षण आणि परीक्षण करण्यासाठी दक्षिणी बेटसमूहाच्या परिसरात प्रत्यक्ष सराव स्थळाला भेट दिली आणि मोहिमांसाठी उच्च दर्जाची सिद्धता होण्यासाठी सर्व श्रेणीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.





U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1692120)
Visitor Counter : 254