विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारतातील शीर्षस्थ विचारवंत नेते एसटीआयपीच्या मसुद्यावर  आपली दृष्टी आणि  संकल्पना मांडणार


या धोरणात्मक पत्रिकेचे उद्दिष्ट देशाच्या भवितव्याला आकार देण्यासाठी सर्वसमावेशक बाबींचा विचार करणे हे आहे: प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भारत सरकार, प्राध्यापक के.विजयराघवन

Posted On: 24 JAN 2021 7:04PM by PIB Mumbai

 

5 व्या राष्ट्रीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनिर्माण धोरणाच्या मसुद्यावर  आज एका वेबीनारमध्ये विचार विनिमय करण्यात आला ज्यात विविध क्षेत्रातील भारतातील शीर्षस्थ तज्ञ आणि विचारवंत नेते सहभागी झाले आणि त्यांनी त्यांच्या विविध प्रकारच्या समृध्द संकल्पनांनी त्या मसुद्याला बळकटी आणली.

"गेल्या काही वर्षांत, तंत्रज्ञानात अनेक बदल घडून देशात डिजिटल क्रांती झाली आहे.या परीवर्तनाचा विचार करत असताना आपले मूलाधार आपल्या संस्कृतीत असण्याची आवश्यकता आहे.  त्या दृष्टिने एक पाऊल म्हणजे आपल्या भाषा प्रयोगशाळांचे सबलीकरण करायला हवे.या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी  विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान  व्यावहारीक रीतीने अंमलात आणले पाहिजे.  या धोरणात्मक दस्तावेजाचे  उद्दिष्ट देशाच्या भवितव्याचा आकार घडविण्यासाठी सर्व गोष्टी विचारात घेणे,हे आहे.

दिनांक 23 जानेवारी 2021रोजी आयोजित केलेल्या एका वेबिनारमधे विचारविनिमय करताना भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राधापक के.विजयराघवन म्हणाले.त्यांनी  धोरण प्रक्रिया चौकटीच्या दस्ताऐवजाच्या आवश्यकतेवर आणि त्याच्या अंमलबजावणीच्या रणनीतीच्या अंतिम प्रक्रियेवर भर दिला.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा म्हणाले,भविष्यासाठी सज्ज रहाण्यासाठी, राज्यांनी केंद्राशी संपर्क साधून विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीचा उपयोग करून त्यांचे प्रश्न सोडविण्याची आवश्यकता आहे.

ते पुढे म्हणाले की, आपण निर्माण केलेल्या ज्ञानावर लक्ष केंद्रित करतो तथापि त्यात नाविन्य आणण्यासाठी -ज्ञानाला नवनिर्माणाशी  जोडून घेण्यासाठी आपण त्याचा उचित उपयोग केला पाहिजे.

या चर्चेच्या 300 फेऱ्या झाल्या आहेत. प्रथमच आम्ही राज्ये,त्यांची मंत्रालये आणि इंडियन डायस्पोरा (परदेशस्थ भारतीय)यांच्याशीही विचार विनिमय केला आहे. अशा प्रकारच्या चर्चेमुळे या दस्ताऐवजांना अधिक सर्वसमावेशक करणे शक्य होईल,असे डीएसटीचे सल्लागार आणि एसटीआयपीच्या सचिवालयाचे प्रमुख डॉ. अखिलेश गुप्ता यांनी सांगितले.

सागरी विकास विभागाचे सचिव आणि जगप्रसिध्द भूकंपतज्ञ डॉ. हर्ष गुप्ता, अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी शाळेतील  (विद्यापीठातील) विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षणतज्ञ प्राध्यापक शीला जासनाॅफ,राज्यसभेचे माजी महासचिव योगेंद्र नारायण, विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या महासंचालक आणि सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ञ डॉ. सुनीता नारायण ,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स्ड स्टडीजचे संचालक मकरंद आर.परांजपे , मिशिगन विद्यापीठातील सार्वजनिक धोरण या विषयाच्या तज्ञ शोबिता पार्थसारथी यांनी या वेबिनारमधे सहभाग घेतला.

या एसटीआयपीचा मसूदा सार्वजनिक चर्चेसाठी 31 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला. पुढील दोन सप्ताह यावर चर्चेची मालिका  आयोजित करण्यात आली आहे. आपल्या सूचना, हरकती पाठविण्याची मुदत येत्या 31 जानेवारी 2021पर्यंत वाढविण्यात आली आहे.

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1691924) Visitor Counter : 293