युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय मुष्टीयोध्दा चॅम्पिअनशिपमधे कोविड नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय क्रिडा प्राधिकरणाने मागविला अहवाल
प्रविष्टि तिथि:
24 JAN 2021 3:40PM by PIB Mumbai
दिनांक 23 जानेवारीला नोयडा स्टेडियमवर राष्ट्रीय मुष्टीयोध्दा चॅम्पिअनशिपमधे कोविड नियमावलीचे उल्लंघन केल्याच्या संदर्भातील माध्यमांनी नोंद केलेल्या कोविड नियमावलींमधील शारिरीक अंतर आणि इतर एसओपीजचा, जाणीवपूर्वक अवमान केल्याची भारतीय क्रिडा प्राधिकरणाने म्हणजे (SAI) साईने दखल घेतली असून त्या संदर्भातील अहवाल मागविला आहे.
या विषयावर बोलताना साईचे महासंचालक संदीप प्रधान म्हणाले ," आम्ही ही बाब भारतीय कुस्ती महासंघाकडे नेली असून आणि स्पर्धांच्या वेळी एसओपीजचे कठोरपणे पालन केले पाहिजे याचा आग्रह धरला आहे.” आम्ही महासंघाकडून हे उल्लंघन झाल्या संदर्भातील अहवाल सोमवारपर्यंत मागविला आहे. महासंघाने शिष्टाचारांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे.
भारतीय क्रिडा प्राधिकरणाने म्हणजे साईने भारतीय आँलिंपिक संघटनेला खेळाडूंची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना कोविड शिष्टाचारांचे पालन कठोरपणे पालन करण्याबाबत अवगत करण्याची विनंती देखील केली आहे.
G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1691872)
आगंतुक पटल : 146