संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री यांनी दूरध्वनीवरील संवादात संरक्षण सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2021 6:58PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 21 जानेवारी 2021 रोजी इंडोनेशियाचे संरक्षणमंत्री जनरल प्रबोवो सुबीअंतो यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. कोविड 19 ने घातलेल्या मर्यादा असूनही दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या संरक्षण सहकार्याबद्दल दोन्ही मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
दोन्ही मंत्र्यांनी प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती आणि कायद्याच्या आधारे स्वतंत्र व मुक्त सागरी व्यवस्थेची आवश्यकता यावर आपापले विचार मांडले.
दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांना आणखी चालना दिली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1690957)
आगंतुक पटल : 226