उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी केंद्राला हैद्राबादमधे लस चाचणी आणि प्रमाणपत्र प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत विचार करण्यास सांगितले
Posted On:
21 JAN 2021 3:57PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी संभाषण करून तेलंगणा सरकारने हैदराबाद येथील जीनोम व्हॅली लस चाचणी आणि प्रमाणपत्र प्रयोगशाळा सुरू करण्याच्या विनंतीवर विचार करण्याचे आवाहन केले.
तेलंगणाचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री. के.टी.रामाराव यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना केलेल्या या संदर्भात केलेल्या विनंतीचा उल्लेख उपराष्ट्रपतींनी नायडू यांनी यावेळी केला. राव यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात असे निदर्शनास आणून दिले की, हैद्राबाद दरवर्षी सहा अब्जपेक्षा अधिक डोस तयार करत असून जागतिक लस उत्पादनात एक तृतियांश योगदान देत आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी उपराष्ट्रपतींना आश्वासन दिले की ते सर्व बाजूंनी या विनंतीचे परीक्षण करतील. त्यांनी उपराष्ट्रपतींना अशी माहिती दिली, की जगभरात सात लसचाचणी आणि प्रमाणपत्र प्रयोगशाळा होत्या, ज्यात हिमाचल प्रदेशातील कसौली येथील एक आहे आणि अशा प्रकारच्या सुविधेसाठी आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मान्यता मिळवावी लागते.
***
S.Tupe/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1690865)
Visitor Counter : 188