संरक्षण मंत्रालय

20 जानेवारी 2021 रोजी भारत - सिंगापूर दरम्यान संरक्षण मंत्र्यांचा 5 वा संवाद


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि सिंगापूरचे संरक्षणमंत्री डॉ. एनजी. इंग हेन यांचे संयुक्त निवेदन

Posted On: 20 JAN 2021 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जानेवारी 2021


भारत आणि सिंगापूर दरम्यान संरक्षण मंत्र्यांचा 5 वा संवाद (डीएमडी) 20 जानेवारी 2021 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यशस्वीपणे पार पडला.गेल्या काही वर्षांत द्विपक्षीय सहकार्य आणि संरक्षण भागीदारीत भरीव वाढ होत आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यात संरक्षण आणि सुरक्षा गुंतवणूकीने सशस्त्र सैन्याच्या तीनही सेवा तसेच संरक्षण तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात व्यापक प्रमाणात आणि कार्यक्षेत्रात विस्तृतपणे वाढ झाली आहे.

या 5 व्या डीएमडीमध्ये, दोन्ही नौदलातील पाणबुडी बचाव, मदत आणि सहकार्य याविषयीच्या अंमलबजावणी करारावर स्वाक्षरी झाल्याचे पाहून दोन्ही मंत्र्यांनि  आनंद व्यक्त केला.

परस्पर हितसंबंधातील आपत्ती प्रतिसाद व क्षमता बांधणी कार्यात दोन सशस्त्र दलांसाठी निकट परिचालन सहकार्यासाठी ऑगस्ट 2020 मध्ये मानवीय सहाय्य व आपत्ती निवारण (एचएडीआर) सहकार्यावरील अंमलबजावणी करारासह द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा विस्तार करण्याच्या उपक्रमांचे उभय  मंत्र्यांनी स्वागत केले.

या चर्चेदरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी त्यांच्या सशस्त्र सैन्याने जागतिक कोविड -19 महामारीच्या दरम्यान संरक्षण आणि सुरक्षा याविषयी आलेले अनुभव तसेच या दरम्यान अनुसरलेल्या सर्वोत्तम पद्धतीं यांची माहिती घेतली.

नोव्हेंबर 2020 मध्ये आयोजित भारतीय नौदल आणि सिंगापूर नौदलाने सिंगापूर-भारत सागरी द्विपक्षीय प्रात्यक्षिकाची (SIMBEX) 27 वी फेरी यशस्वीरित्या पार पाडली तसेच सिंगापूर-भारत-थायलंड सागरी प्रात्यक्षिकाच्या (SITMEX) दुसर्‍या फेरीत भाग घेतला याबद्दल मंत्र्यांनी संतोष व्यक्त केला.

राजनाथ सिंह यांनी प्रादेशिक सुरक्षा स्थापत्यामध्ये  ''आसियान'' देश  केंद्रस्थानी असल्याची पुष्टी केली आणि आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठक (एडीएमएम) प्लस च्या या सर्व प्रयत्नांना भारताने पाठिंबा दर्शविला. डॉ एनजी यांनी मानवीय सहाय्य व आपत्ती निवारण (एचएडीआर) वर एडीएमएम प्लस तज्ज्ञांच्या वर्किंग ग्रुपच्या आगामी सह-अध्यक्षतेसाठी पाठिंबा दर्शविला.

दोन्ही मंत्र्यांनी भारत आणि सिंगापूर यांच्यात द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक वृद्धिंगत करण्याविषयी कटिबद्धता व्यक्त केली असून या प्रदेशात कायमस्वरुपी शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी बहुपक्षीय उपक्रमांना पाठिंबा दर्शविला.

प्रसिद्धी प्रत्रक  पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


* * *

Jaydevi PS/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1690488) Visitor Counter : 229