संरक्षण मंत्रालय

भारत - सिंगापूर दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि सिंगापूरचे संरक्षणमंत्री डॉ. एनजी इंग हेन यांच्यात 5 वा संवाद

Posted On: 20 JAN 2021 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जानेवारी 2021

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 20 जानेवारी 2021 रोजी सिंगापूरचे संरक्षणमंत्री डॉ. एनजी इंग हेन यांच्यासमवेत भारत-सिंगापूर दरम्यानच्या पाचव्या संवादाचे सहअध्यक्षपद भूषविले. सध्या सुरू असलेल्या कोविड -19 महामारीमुळे मर्यादा असूनही दोन्ही देशातील संरक्षण सहकार्यातील योगदानाबद्दल उभय मंत्र्यांनी या आभासी संवादात समाधान व्यक्त केले.

आभासी संवादा दरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी सिंगापूरमध्ये लागू केलेल्या महामारी निवारणार्थ उपायांच्या परिणामकारकतेबद्दल आणि कोविड 19 च्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी सिंगापूर सशस्त्र दलाच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले. त्यांनी कोविड 19 प्रतिबंधासाठी आणि विदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी राबविल्या गेलेल्या विविध मोहिमांमध्ये आपल्या सशस्त्र दलाची भूमिका अधोरेखित केली. सिंगापूरचे संरक्षणमंत्री डॉ. एनजी इंग हेन यांनीही कौतुकाला दाद दिली आणि महामारीवर नियंत्रण ठेवण्यात सरकारच्या संपूर्ण दृष्टिकोनात सशस्त्र सैन्याच्या भूमिकेबद्दल मत व्यक्त केले.

दोन्ही मंत्र्यांनी दोन्ही देशांमधील वाढत्या संरक्षण संबंधांवरही समाधान व्यक्त केले. दोन्ही बाजूंनी गेल्या वर्षभरात राबविल्या गेलेल्या विविध द्विपक्षीय संरक्षण सहकाराच्या पुढाकाराच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि सशस्त्र सेना तसेच संरक्षण तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीचे प्रमाण आणखी वाढवण्याची वचनबद्धता व्यक्त केली. चर्चेदरम्यान दोन्ही मंत्र्यांनी संभाव्य सहकार्याच्या नवीन क्षेत्रांवर चर्चा केली आणि या दिशेने त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट केला. मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय नौदल आणि सिंगापूर नौदल यांच्यात पाणबुडी बचाव समर्थन आणि सहकार्यावरील अंमलबजावणी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

या बैठकीत संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार उपस्थित होते.

सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांसोबतचे संयुक्त निवेदन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690580) Visitor Counter : 159