संरक्षण मंत्रालय

पूर्वावलोकन- इंडो-फ्रेंच सराव डेझर्ट नाइट -21

Posted On: 19 JAN 2021 12:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021

भारतीय हवाई दल आणि फ्रेंच हवाई आणि अंतराळ दल  (Armée de l'Air et de l'Espace) 20 ते 24 जानेवारी 2021 दरम्यान  जोधपूर हवाई तळावर डेझर्ट नाइट -21 हा द्विपक्षीय हवाई सराव करतील.

फ्रान्सकडून राफेल, एअरबस ए -330 मल्टी-रोल टँकर ट्रान्सपोर्ट (एमआरटीटी), ए -400 एम रणनीतिक परिवहन विमान आणि अंदाजे 175 कर्मचारी सहभागी होतील. या सरावात सहभागी होणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या विमानांमध्ये मिराज 2000, एसयू -30 एमकेआय, राफेल , आयएल -78 फ्लाइट रिफ्यूलिंग एअरक्राफ्ट, एडब्ल्यूएसीएस आणि एईडब्ल्यू अँड सी विमानांचा समावेश आहे.

दोन हवाई दलांदरम्यान सहभागाच्या मालिकेतला हा सराव महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भारत -फ्रेंच संरक्षण सहकार्याचा एक भाग म्हणून, भारतीय हवाई दल आणि फ्रेंच हवाई आणि अंतराळ दलाने 'गरुड' नावाच्या हवाई कवायतीच्या सहा आवृत्त्या आयोजित केल्या, त्यातील शेवटची कवायत 2019 मध्ये फ्रान्सच्या मॉन्ट-डे-मार्सन हवाई तळावर झाली. विद्यमान सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याच्या उपाया अंतर्गत दोन्ही दले 'हॉप-कवायती' आयोजित करण्यासाठी उपलब्ध संधींचा फायदेशीर उपयोग करत आहेत. 2018 मध्ये  ऑस्ट्रेलियामध्ये एक्स पिचब्लॅकसाठी उड्डाण घेताना, फ्रेंच एअर आणि स्पेस फोर्सच्या तैनातीसाठी आग्रा आणि ग्वाल्हेर हवाई तळावर भारतीय नौदलाने लढाऊ आणि एमआरटीटी विमानांचा सराव उपलब्ध करून दिला होता. सध्या, एक्स डेझर्ट नाइट -21 साठी फ्रेंच टुकडी त्यांच्या 'स्कायरोस तैनाती'चा एक भाग म्हणून आशियामध्ये तैनात आहे आणि जोधपूर हवाई तळावर दल नेण्यात येईल.

हा सराव अद्वितीय आहे, कारण यात दोन्ही देश राफेल विमानांची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत आणि दोन प्रमुख हवाई दलांमधील वाढत्या सुसंवादाचे हे लक्षण आहे.

 

U.Ujgare/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689915) Visitor Counter : 233