गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात अनेक प्रकल्पांचे उद्घाटन


मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे

Posted On: 17 JAN 2021 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जानेवारी 2021


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात अनेक प्रकल्पांची सुरुवात केली.  दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज साखर कारखान्याचा विस्तार प्रकल्प आणि  विजया बँकेच्या 75 व्या शाखेचे उद्घाटन केले. आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि  अनेक शेती प्रकल्पांचीही त्यांनी  पायाभरणी केली. या प्रसंगी अमित शहा म्हणाले की  मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. यावेळी केंद्रीय कोळसा व खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोल, कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई, व अन्य राज्यमंत्री व नेते उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने 2015 मध्ये इथेनॉलच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आणि इथेनॉलवरील केंद्रीय अबकारी कर हटवण्यासाठी प्रयत्न केले आणि 2018 मध्ये जीएसटी शुल्क 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केले जेणेकरून पेट्रोलमधील  इथेनॉल मिश्रणामुळे शेतकऱ्यांना  फायदा होऊ शकेल. शाह म्हणाले की आज निरानी समूहाकडून दररोज 2,600 किलोलीटर इथेनॉल तयार करण्याची प्रक्रिया केली जात आहे जो एक स्तुत्य प्रयत्न आहे. नवीन इंधन धोरणांतर्गत इथेनॉल तयार करण्यासाठी उसाचा रस, कच्ची साखर, मळी व कुजलेले धान्य वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अमित शहा म्हणाले की जेव्हा मोदी सरकारने कार्यभार स्वीकारला तेव्हा 1.58 टक्के इथेनॉल मिश्रण केले जात होते, जे मोदी सरकारने 2022  पर्यंत 10  टक्क्यांवर आणि  2025  पर्यंत 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास  प्राधान्य दिले आहे आणि मोदी सरकारने कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 1,34,399 कोटी रुपयांवरून 2013-14 मध्ये 21,931 कोटी रुपयांपर्यंत वाढवली.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की मोदीजींच्या नेतृत्वाखाली  काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेऊन दीर्घकालीन समस्या सोडवली.


* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1689477) Visitor Counter : 197