युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

सर्व नवीन आणि अद्ययावत क्रीडा सुविधा केंद्रांना क्रीडापटूंची नावे देण्याचा क्रीडा मंत्रालयाचा निर्णय

Posted On: 17 JAN 2021 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जानेवारी 2021


देशातील क्रीडा क्षेत्रातील नायकांचा सन्मान करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या आगामी आणि अद्ययावत क्रीडा सुविधा  केंद्रांना भारतातील क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या सुप्रसिद्ध क्रीडापटूंची नावे देण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात नव्याने बांधण्यात आलेले वातानुकूलित कुस्ती सभागृह आणि लखनौमधील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र येथील  जलतरण तलाव, भोपाळमधील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रातील 100 खाटांचे वसतिगृह, सोनपतच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रातील मुलींचे बहुउद्देशीय सभागृह आणि वसतिगृह, गुवाहाटी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात जिथे वसतिगृह बहुउद्देशीय सभागृह आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत, त्या सर्वांना स्थानिक क्रीडा पटूंची नावे देण्यात येतील.

या निर्णयाविषयी बोलताना केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरण रिजीजू म्हणाले, "देशात क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी आपल्या क्रीडापटूंना  ते पात्र असलेला सन्मान  मिळायला हवा, कारण तरच तरुण पिढीला क्रीडा क्षेत्रात करीअर करण्यासाठी उत्साह वाटेल. सरकार आधीपासूनच पूर्वीच्या आणि आत्ताच्या क्रीडापटूंना  आरामाचे आणि सन्मानाने जीवन जगता येईल, हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करत आहे. क्रीडापटूंच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाची ओळख करून देण्यासाठी क्रीडा सुविधा केंद्रांना क्रीडापटूंची नावे देणे हा सरकारची क्रिडापटूंबद्दलची प्रतिबध्दता दृढ करण्याचा प्रयत्न आहे."


* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1689434) Visitor Counter : 190