विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

डॉ. हर्ष वर्धन यांनी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन (एनआयएफ) द्वारा विकसित इनोव्हेशन पोर्टल देशाला समर्पित केले


इनोव्हेशन पोर्टल आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल आहे : डॉ हर्ष वर्धन

Posted On: 14 JAN 2021 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जानेवारी 2021

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन (एनआयएफ) - भारत या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) स्वायत्त संस्थेने  विकसित केलेले एक इनोव्हेशन पोर्टल आज, नवी दिल्लीत राष्ट्राला समर्पित केले.

अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय आणि मानवी आरोग्यासंदर्भात देशातील सामान्य लोकांकडून संकलित केलेल्या सुमारे 1.15 लाख नवसंकल्पना या राष्ट्रीय इनोव्हेशन पोर्टल (एनआयपी) वर उपलब्ध आहेत. सध्या पोर्टलवर  नवसंशोधनात ऊर्जा, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती, रासायनिक, नागरी, वस्त्रोद्योग, शेती / लागवड पद्धती , साठवण पद्धती , वनस्पती प्रकार, वनस्पती संरक्षण, कुक्कुटपालन, पशुधन व्यवस्थापन, पोषक आहाराशी संबंधित चमू इत्यादीं विषयांशी निगडित नवसंकल्पनाचा  समावेश आहे.

या प्रसंगी बोलताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, गेल्या 6 वर्षात नवोन्मेष चळवळ प्रज्वलित करण्यात आणि देशात नवोन्मेष परिसंस्था निर्माण करण्याचे श्रेय पंतप्रधानांना जाते. आपल्या सर्जनशील क्षमता आणि अभिनव विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित उपायांच्या माध्यमातून समस्या आणि आव्हानांवर मात करणाऱ्या आत्मनिर्भर नागरिकांचे त्यांनी अभिनंदन केले. पारंपारिक ज्ञानाच्या वाढत्या महत्त्वावर, विशेषत: आदिवासी भागातील वनौषधी पद्धतींवर त्यांनी भर दिला. इनोव्हेशन पोर्टलचे हे एक मुख्य आकर्षण आहे.

इनोव्हेशन पोर्टल एक परिसंस्था तयार करेल जेथे विविध संस्था कल्पना आणि अभिनवता यांचे उद्योजकतेत रूपांतरित करू शकणार्‍या सर्वांच्यापाठीशी उभ्या राहतील असे त्यांनी सांगितले.

इनोव्हेशन पोर्टल हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने  एक पाऊल आहे आणि विद्यार्थी, उद्योजक, एमएसएमई, तंत्रज्ञान व्यवसाय इनक्यूबेटर (टीबीआय) आणि विविध व्यवसायांमध्ये गुंतलेल्या सामान्य लोकांसाठी एक उत्कृष्ट संसाधन आहे.

राष्ट्रीय इनोव्हेशन पोर्टलची  पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1688643) Visitor Counter : 246