मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

देशातील एव्हीयन इन्फ्लुएंझाची स्थिती

Posted On: 13 JAN 2021 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021

देशातील 10 राज्यात दिनांक 13 जानेवारी, 2021 पर्यंत एव्हीयन इन्फ्लूएंझाच्या घटनांची पुष्टी झाली आहे. पुढे, जम्मू-काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यात आणि झारखंडच्या 4 जिल्ह्यांमध्ये पक्ष्यांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटना नोंदविल्या गेल्या आहेत.

पशुपालन आणि दुग्धविकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली, दिनांक  12 जानेवारी, 2021 रोजी, एक व्हिडीओ काँन्फरन्स आयोजित करण्यात आली होती, त्याला 17 राज्यांतील प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. सभेच्या माध्यमातून राज्यांना अ‍ॅक्शन प्लान 2021 च्या अनुषंगाने आपापल्या राज्यात एव्हियन इन्फ्लूएंझाच्या प्रसाराचे कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्याचा सल्ला देण्यात आला. राज्यातील परिस्थितीशी सामना करण्यासाठी, राज्यांना आरोग्य आणि वन विभागाशी समन्वय साधण्यास आणि त्याबाबत अवगत करण्यास सांगण्यात आले. राज्यांना संरक्षण उपकरणांचा पुरेसा पुरवठा आणि कुक्ककुटपालन केंद्रांतील  जैव-सुरक्षा उपाय करण्यास सांगितले आहे. राज्यातील संक्रमणाची ओळख वेगाने करण्यासाठी आणि नियंत्रण यंत्रणेची वेळेत ओळख करुन देण्यासाठी राज्य स्तरावर बीएसएल-II प्रयोगशाळेची ओळख करण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले. कुक्कुटपालन केंद्रामध्ये हा संसर्ग पसरू नये याची काळजी घेण्यास राज्यांनाही सांगण्यात आले कारण पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांचा त्यामुळे आर्थिक भार वाढेल. बरीच राज्ये इतर राज्यांमधून कुक्कुटपालन आणि कुक्कुटपालन उत्पादनांच्या पुरवठ्यावर बंदी घालत आहेत असे आढळून येत आहे.  यामुळे कुक्कुटपालन उद्योगावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांमध्ये आणखी भर पडेल, अशा निर्णयांवर पुनर्विचार करण्याची विनंती राज्यांना करण्यात आली आहे.

राज्यांमार्फत वृत्तपत्र जाहिराती, चर्चासत्र इत्यादींच्या माध्यमातून जनजागृती उपक्रम आयोजित केले जात आहेत. राज्यांना माहिती आणि जनसंपर्क संचालनालय यांच्या पाठिंब्याने असे जनजागृती करणारे उपक्रम सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले असून अशा कामांसाठी निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले गेले आहे. राज्यांनी कोंबड्या आणि अंडी वापरण्याबाबत करण्याच्या आणि टाळण्याच्या गोष्टींची माहिती जारी करायला हवी, जेणेकरून अफवा / चुकीची माहिती पसरणे टाळता येईल आणि त्यामुळे कुक्कुटपालकांचे होणारे  आर्थिक नुकसान टाळता  येईल.

 

M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1688347) Visitor Counter : 181