मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
एव्हियन एनफ्लूएन्झा बाबत देशातली स्थिती
Posted On:
12 JAN 2021 7:35PM by PIB Mumbai
12 जानेवारी 2021 पर्यंत एव्हियन एनफ्लूएन्झा (H5N8) च्या आणखी प्रकरणांची पुष्टी झाली असून राजस्थान मधल्या झुनझुनू जिल्ह्यातल्या एचसीएल- खेत्रीनगर मध्ये मृत कावळ्यांमध्ये एव्हियन एनफ्लूएन्झा (H5N8) ची पुष्टी झाली. याशिवाय उत्तर प्रदेशातल्या कानपूर इथे मृत कावळ्यांमध्ये, (H5N1) प्राणी संग्रहालयातल्या पेलिकनमध्ये, हिमाचल प्रदेशातल्या कांग्रा जिल्ह्यातल्या फतेहपुर गावात आणि जगनोली मध्ये मृत कावळ्यांमध्ये या रोगाची पुष्टी झाली आहे. तसेच मध्य प्रदेशातल्या झाबुआ जिल्ह्यातल्या कुक्कुट पालन केंद्रात एव्हियन एनफ्लूएन्झा(H5N1) ची पुष्टी, भोपाळ इथल्या प्राणी रोग विषयक राष्ट्रीय संस्थेने केली आहे.
पशु पालन आणि दुग्ध विकास विभागाने चाचणी संदर्भात राज्यांना नियमावली जारी केली असून राज्य स्तरावर पुरेशा जैव सुरक्षा सुविधांसह चाचणी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. मृत पक्ष्यांच्या नमुना तपासणीत एव्हियन एनफ्लूएन्झाचा महाराष्ट्रात प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरातला भेट देण्यासाठी केंद्रीय पथक नियुक्त करण्यात आले आहे.या राज्यांमधल्या या रोगाच्या केंद्र बिंदूवर हे पथक लक्ष ठेवेल.
एव्हियन एनफ्लूएन्झा आणि त्या संदर्भातली परिस्थिती हाताळण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत, यासाठी ट्वीटरसह विविध सोशल मिडीयाचा उपयोग करण्यात येत आहे. बाधित पक्षांना नष्ट करण्यासाठीच्या कामासाठी पुरेसे पीपीई संच आणि आवश्यक सामग्री राखण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात आल्या आहेत.
****
S.Tupe/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688033)
Visitor Counter : 176